'वर्क फ्रॉम होम'च्या काळात असा बूस्ट करा तुमच्या WiFi इंटरनेटचा स्पीड...

'वर्क फ्रॉम होम'च्या काळात असा बूस्ट करा तुमच्या WiFi इंटरनेटचा स्पीड...
Updated on

मुंबई - जगभरात कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढलाय. अशात भारतातही कोरोना व्हायरस आपले हातपाय पसरू पाहतोय. देशातील कोरोना पॉझिटिव्ह केसेस दिवसागणिक वाढताना पाहायला मिळतायत. खबरदारीचा उपाय म्हणून भारताने आपल्या सीमा इतर देशातून येणाऱ्या प्रवासी विमानांसाठी बंद केल्या आहेत. महाराष्ट्रात संचारबंदी लागू झालीये. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या सीमा देखील सील करण्यात आल्यात. 

जगभरात पसरणाऱ्या कोरोना महामारीमुळे आपल्यापैकी सर्वांनाच सोशल डिस्टंसिंगचं आवाहन करण्यात आलंय. याचसोबत लॉकडाऊनच्या परिस्थितीत घरातूनच काम करण्याचं आवाहन सरकारकडून केलं गेलंय. आपण तसं करतोय देखील. अशात आपल्याला आणखी किती दिवस घरातून काम करायला लागणार याची कल्पना नाही. त्यामुळे घरातून नीट काम करायचं असेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे इंटरनेट. जर तुमचं इंटरनेट सुरळीत चालत असेल तर 'वर्क फ्रॉम होम' ची निम्मी लढाई तुम्ही जिंकली म्हणून समजा. 

दरम्यान चांगल्या कंपनीचं इंटरनेट कनेक्शन असूनही तुमचं इंटरनेट रडत असे, स्लो झालं असेल तर तुम्हाला मोठ्या मनस्तापाचा सामना करावा लागू शकतो. तर मग जाणून घ्या तुमचं घरातलं इंटरनेट WiFi कसं बूस्ट करायचं ते 

WiFi रावटर चेक करा 

मॉडर्न  WiFi रावटर्स हे  2.4GHz किंवा 5GHz या फ्रिक्वेन्सीवर चालतात. तुमच्या घरातील WiFi रावटरची फ्रिक्वेसनी चेक करा. 5GHz चा WiFi रावटर वापराल तर तुमचा इंटरनेट स्पीड वाढू शकतो. 

रावटरची जागा चेक करा : 

वायफाय  रावटरची जागा अत्यंत महत्त्वाची असते. अशात तुमचं रावटर भिंतीपाशी नाहीये ना? हे तपासून घ्या. वायफाय रावटरची जागा बदलल्यामुळे तुमच्या इंटरनेट स्पीडमध्ये मोठा फरक पडू शकतो. रावटर हा खोलीच्या मध्यभागी उंचावर ठेवल्यास इंटरनेट स्पीड वाढू शकतो.  वायफाय रावटर हे बंद कपाटात किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या जवळ ठेऊ नका. उदाहरणार्थ मायक्रोव्हेव्ह, वायरलेस कॅमेरा, किंवा वायरलेस टेलिफोन. यामुळे तुमचं इंटरनेट स्लो होतं. या गोष्टींची काळजी घ्या. 

मोठी बातमी - मुंबईतून आली कोरोनासंदर्भात अत्यंत दिलासादायक बातमी
     
एकाचवेळी अनेक डिव्हायसेस कनेक्ट करू नका 

वायफाय रावटरला एकाच वेळीस अनेक डिव्हायसेस कनेक्ट करू नका. एकावेळी अनेक डिव्हायसेस कनेक्ट केल्याने इंटरनेट स्पीड विभागाला जातो. आणि तुमचं इंटरनेट स्लो होतं. त्यामुळे लक्षात ठेवा, जेवढे कमी डिव्हायसेस तेवढा जास्त इंटरनेट स्पीड.  

हार्डवेअर चेक करा : 

अनेकदा तुमचं वायफाय रावटर हे नवीन आणि फास्ट जरी असलं तरीही तुम्ही वापरात असलेला कॉम्प्युटर हा जर जुना असेल, तर तुमचं इंटरनेट स्लो चालेल. किंवा तुमचा लॅपटॉप हा अद्ययावत असेल आणि तुमचं वायफाय रावटर जुनं असेल तरीही इंटरनेट स्पीड कमी होतो. तुमचं इंटरनेट फास्ट चालण्यासाठी तुमचं हार्डवेअर चेक करा.

COVID19 : कोरोनाबाबत नसत्या अफवा पसरावणाऱ्यांच्या तोंडावर मारा 'ही' बातमी

रिसेट अँड रिस्टार्ट 

अनेकदा रावटर रिसेट आणि रिस्टार्ट केल्याने इंटरनेटचा स्पीड वाढलेला पाहायला मिळतो. त्यामुळे तुमचं इंटरनेट स्लो असेल तर एकदा रिसेट आणि रिस्टार्ट ही युक्ती करून पाहा. 

few very important hacks to boost your wifi internet speed in work from home situation

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.