मुंबई : बिहार विधानसभा निकालांच्या पार्श्वभूमीवर देशातही राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. आजच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी नितीशकुमारांना टोला लगावलाय. गेल्या पंधरा वर्षांचे बिहारमधील 'जंगलराज' आता समाप्त झाले आणि आता बिहारमध्ये 'मंगलराज' सुरु झाले आहे, असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे. बिहारमध्ये महाराष्ट्राच्या नावावर निवडणुका लढवण्याचा भाजपने प्रयत्न केला. मात्र भाजपाला जनतेने नाकारलं आहे. महाराष्ट्र हा देशात होणाऱ्या परिवर्तनामध्ये कायम अग्रेसर राहील असेही खासदार संजय राऊत म्हणालेत.
बिहार विधानसभा निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर बोलताना राऊत म्हणालेत की, तेजस्वी यांना बिहारमधील जनतेची उत्तम साथ मिळत आहे. बिहारमध्ये आता तेजस्वी लाट आली असून बिहारमधील १५ वर्षांचे 'जंगलराज' समाप्त झालं आणि आता 'मंगलराज' सुरु झालं आहे.
महत्त्वाची बातमी : शिवडी रुग्णालय मृतदेह प्रकरणः डॉक्टर, परिचारिकांना बडतर्फ करण्याचा निर्णय
दरम्यान, आज सकाळी आघाडीवर असलेली महागठबंधन दुपारी १२ वाजताच्या सुमारास खाली आलेली पाहायला मिळाली. राष्ट्रीय जनता दल या तेजस्वी यादव यांच्या पक्षाचे दुपारी १२ वाजेपर्यंत ६१ उमेदवार आघाडीवर होते. तर दुसरीकडे भाजप हा राष्ट्रीय जनता दल पक्षापेक्षा पुढे जात ७३ जागांवर आघाडीवर होता. त्यामुळे NDA चे आकडे दुपारी १२ वाजेपर्यंत १२७ तर महागठबंधन १०१ जागांवर आघाडीवर होते. महत्त्वाची बाब म्हणजे राजद आणि भाजपमध्ये 'कांटे कि टक्कर' पाहायला मिळतेय. सकाळी दिसणाऱ्या सुरवातीच्या कलांमध्ये महागठबंधन १२४ तर एनडीए ८७ जागांवर आघाडीवर होते.
fifteen years of jangalraj will end and mangalraj will start in bihar says sanjay raut
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.