50 कोटींची मनी लाँडरींग केल्याच्या आरोपाखाली बिल्डरला अटक

money scam
money scamsakal media
Updated on

मुंबई : पन्नास कोटींपेक्षा जास्त रकमेची मनी लाँडरींग (Fifty Crore Scam) केल्याच्या आरोपाखाली सक्तवसुली संचलनालय (Enforcement Directorate) मोनार्क युनिवर्सल ग्रुपचे संचालक गोपाळ ठाकूर (Gopal Thakur) यांना अटक केली आहे. याप्रकरणी न्यायालयाने ठाकूर यांना 8 जुलैपर्यंत ईडी कोठडी ( Arrest) सुनावली आहे. फ्लॅट खरेदी करण्यासाठी इच्छुक ग्राहकांकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी ठाकूर यांच्याविरोधात नवी मुंबई येथील खारघरसह इतर ठिकाणी भांदवि कलमांतर्गत गुन्हे दाखल केले होते. त्याशिवाय काही प्रकरणांमध्ये आरोपपत्रही दाखल (Charge sheet) करण्यात आले होते. त्याच्या आधारावर ईडीने याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली होती. त्यावेळी तपासात आरोपी व त्यांच्या कंपनीने अनेक व्यक्तींना फ्लॅट विकल्याचे निष्पन्न झाले. (Fifty Crore Scam Allegation builder arrested by Enforcement Directorate)

money scam
छोटे व्यापारी आता उद्योजक; बॅंक कर्ज मिळणं होणार सोपं

तेवढेच नाही, तर आरोपीने हे विकलेल्या फ्लॅट ग्राहकांच्या माहितीशिवाय एनबीएफसीकडे गहाण ठेऊन त्या बदल्यात कर्जही घेतले. ही प्रोजेक्टमधील रक्कम अनेक खात्यांमध्ये हस्तांतरीत करण्यात आली. त्यानंतर याच खात्यांद्वारे ही रक्कम व्यवहारात आणली गेल्याचा आरोप आहे. त्यानंतर याप्रकरणी ठाकूर याला ईडीने शुक्रवारी अटक केली. याप्रकरणी त्याला विशेष पीएमएलए न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्याला 8 जुलैपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.नवी मुंबईतील खारघर येथील प्रकल्यामध्ये फसवणूक केल्याप्रकरणी ठाकूर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. तसेच यापूर्वी नवी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेनेही ठाकूरयांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()