Omicron variant In India
Omicron variant In Indiaesakal

ओमिक्रॉनने चिंता वाढवली; मुंबईत ५४ रुग्णांची भर

Published on

मुंबई : आज राज्यात 85 ओमिक्रॉन संसर्ग (Omicron infection) असणऱ्या रुग्णांची नोंद झाली आहे. या पैकी 47 रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (National institute of virology) तर 38 भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने कळवले आहेत. मुंबईत सर्वाधिक 54 बाधितांची (fifty four new omicron patients) नोंद झाली असून मुंबईतील एकूण ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 137 वर पोचली आहे. ( fifty four new omicron patients found in Mumbai)

Omicron variant In India
मुंबई कोरोनाच्या विळख्यात; सात दिवसांत सात पटीने रुग्ण वाढ!

एनआयव्हीने रिपोर्ट केले 47 रुग्णांमध्ये 43 आंतरराष्ट्रीय प्रवासी आणि 4 निकटसहवासित आहेत. त्यात मुंबई 34,नागपूर आणि पिंपरी चिंचवड प्रत्येकी 3,नवी मुंबई आणि पुणे मनपा प्रत्येकी 2,पनवेल, कोल्हापूर आणि बुलढाणा प्रत्येकी 1 रुग्णांचा समावेश आहे. तर आयसर संस्थेने कळवलेल्या 38 रुग्ण समुदाय सर्वेक्षणातून आढळले असून त्यांचा आंतरराष्ट्रीय प्रवासाचा इतिहास नाही. त्यापैकी मुंबई 19,कल्याण डोंबिवली 5,नवी मुंबई आणि पिंपरी चिंचवड प्रत्येकी 3,वसई विरार आणि पुणे मनपा प्रत्येकी 2, पुणे ग्रा. भिवंडी निजामपूर, पनवेल, ठाणे मनपा प्रत्येकी 1 रुग्ण आहे.

आजपर्यंत राज्यात एकूण 252 ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली असून यापैकी 99 रुग्ण बरे झाले आहे. आतापर्यंत 879 प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी 176 नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()