लोकल ट्रेनच्या दोन महिला गटात जागेवरून तुफान हाणामारीनंतर आता सिंहगड एक्स्प्रेसच्या डब्यामध्ये दोन पुरूष प्रवाशांचा गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना समोर आली.
मुंबई - उपनगरीय लोकल ट्रेनच्या दोन महिला गटात जागेवरून तुफान हाणामारीनंतर आता सिंहगड एक्स्प्रेसच्या डब्यामध्ये दोन पुरूष प्रवाशांचा गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहेत. सिंहगड एक्स्प्रेस पुण्यातून मुंबईकडे येत असताना ही घटना बुधवारी घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक 11010 सिंहगड एक्सप्रेस सकाळी पुण्याहून मुंबईकडे येत होती. चिंचवड स्थानकांवर आली असता काही प्रवाशांमध्ये जागा पकडण्यावरून धक्काबुक्की झाली आणि धक्काबुक्कीचे रूपांतर भाडण्यात झाले. त्यानंतर दोन प्रवाशांचा गटात जोरदार हाणामारी सुरु झाली; डब्यात उपस्थित असलेल्या सहप्रवाशांनी दोन्ही प्रवासी गटात मध्यस्ती करून हा वाद थांबला.
यावेळी काही सहप्रवाशांनी या घटनेचा व्हिडिओ मोबाईल कॅमेरा कैद केला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडिया तुफान वायरल होत आहे. मात्र, या घटनेनंतर दररोज मुंबई ते पुणे दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी रेल्वेचा कारभार नाराजी व्यक्त केली आहे.
तिकीट तपासणीस लक्ष देत नाही -
प्रवासी ओंकार वाबळे यांनी सकाळला सांगितले की, सिंहगड एक्सप्रेसने दररोज प्रवास करणारे प्रचंड अरेरावी करतात. या गाडीचे 2 डबे शिवाजीनगरला उघडतात. या ठिकाणी चढणारे प्रवासी लोणावळ्यापर्यंत सहकाऱ्यांसाठी जागा पकडून ठेवतात. कोणी बसायला आलं की थेट हाकलून लावतात. पूर्ण कंपार्टमेंटच अडवून धरतात. यासंदर्भात तक्रारी केल्यानंतरही तिकीट तपासणीस याकडे लक्ष देत नाहीत. रेल्वे प्रशासनाने या घटनेची दखल घेऊन सिंहगड एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा समस्या समजून घ्यावात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.