पनवेल: तळोजा एमआयडीसीतील कासाडी नदीपात्रात आरोग्यास व पर्यावरणास हानिकारक असलेला घनकचरा टाकणाऱ्या, तसेच त्याच भागातील जमिनीवर बेकायदा घनकचऱ्याचे गोडाऊन तयार करणाऱ्या तळोजा एमआयडीसीतील केसीआयएल कंपनीविरोधात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने गुन्हा दाखल केला आहे.
तळोजा एमआयडीसीतील पडघे येथे अशास्रीय पद्धतीने घातक घनकचरा टाकला जात असल्याची तक्रार तळोजा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे ई-मेलद्वारे केली होती. सदर तक्रारीच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे रायगड विभागाचे प्रादेशिक अधिकारी जगन्नाथ साळुंखे यांनी घटनास्थळाची पाहाणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गत 15 ऑक्टोबर रोजी एमपीसीबीचे क्षेत्र अधिकारी अरविंद धपाटे व त्यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहाणी केली.
यामध्ये पडघे गाव येथून पडघे ब्रिजच्या उजव्या बाजूला कासाडी नदीपात्रात घातक घनकचरा अशास्रीय पद्धतीने टाकण्यात आल्याचे आढळून आले.
तसेच सदर ठिकाणी बाजूलाच काही लोकांनी गोडाऊन तयार केल्याचे, तसेच त्यात अशास्त्रीय पद्धतीने घातक घनकचरा तेथील खड्ड्यामध्ये साठवणूक केल्याचेही आढळून आले.
नमुने परिक्षणासाठी पाठविले
एमपीसीबीच्या पथकाने दुसऱ्या दिवशी तळोजा एमआयडीसीतील केसीआयएल कैराव कमोफार्ब इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीत जाऊन पहाणी केली. पथकाने तळोजा एमआयडीसीच्या मदतीने सदर ठिकाणचे घातक घनकचऱ्याचे नमुने मुंबई वेस्ट मॅनेजमेंट येथील लॅबला परिक्षणासाठी पाठवून दिले. तसेच तळोजा पोलिस ठाण्यात केआयसीएल कंपनी विरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी या कंपनीसह इतरांवर गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.
Filed a case against the polluting company in Taloja MIDC
(संपादन ः रोशन मोरे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.