डोंबिवली - नवी मुंबई महापालिकेतून वगळलेली 14 गावे अखेर पुन्हा नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्यात आली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी त्यासंबंधी निर्णय जाहीर केला आहे. गेले अनेक वर्षे हा प्रश्न प्रलंबित होता.
दीड वर्षांपूर्वी याची अधिसूचना निघून देखील अंतिम निर्णय घेतला जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता होती. अखेर निकाल लागल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. नवी मुंबई महापालिकेतून वगळलेली 14 गावे पुन्हा महापालिकेत समाविष्ट करावे यासाठी सर्वपक्षीय विकास समिती पाठपुरावा करत होती.
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री असताना मार्च 2022 मध्ये गावे महापालिकेत समाविष्ट करण्याची घोषणा त्यांनी केली होती, त्यानंतर सप्टेंबर 2022 मध्ये ही गावे पालिकेत समाविष्ट करण्याविषयी अधिसूचना जारी करण्यात आली होती. अधिसूचना जारी होऊन दीड वर्ष उलटले तरी याचा निकाल लावला जात नव्हता.
वर्षा निवासस्थानी कल्याण डोबिवली, उल्हासनगर, नवी मुंबईतील 14 गावे यासंदर्भात सविस्तर आढावा बैठक मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजू पाटील, डॉ. बालाजी कल्याणकर यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते.
या बैठकीत 27 गावे, कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील पुनर्विकास, 14 गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश, उल्हासनगर येथील अनधिकृत बांधकामे नियमाकुल करणे, संत सावळाराम स्मारकासाठी जागा आदी विषयांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील 27 गावातील नागरिकांना 2017 च्या दरानुसार कर भरण्यासंदर्भात दिलासा देतानाच 14 गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे जाहीर केला.
उल्हासनगर येथील अनधिकृत बांधकामे नियमाकुल करण्याबाबत येत्या मंत्रिमंडळात निर्णय घेण्याचे जाहिर करतानाच संत सावळाराम स्मारकासाठी जागा देण्याची कार्यवाही गतिमान करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
याविषयी बोलताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले, 14 गावांन मध्ये जे भूमीपूत्र आहेत गावकरी रहिवाशी आहेत यांची मागणी होती 14 गावांचा समावेश नवी मुबंई महानगरपालिके मध्ये केला पाहिजे. आज तसा निर्णय मुख्यमंत्री यांनी त्याठिकाणी घेतला.
त्याचा जीआर, नोटिफिकेशन देखील यावेळी काढण्यात आले आहे. आणि 14 गाव नवी मुबंई महानगरपालिकेत समाविष्ट करून घेतले आहे. आता त्याठिकाणी डेव्हलपमेंट ही नवी मुबंई मध्ये जश्या प्रकारे होते तशीच 14 गावांमध्ये देखील होईल.
तर स्थानिक आमदार राजू पाटील म्हणाले, नवी मुंबई महानगरपालिकेत प्रवेशासाठी कल्याण ग्रामीण मतदारसंघातील 14 गावांनी ग्रामपंचायत निवडणुकांवर सहा वेळा बहिष्कार टाकला होता.
मी आमदार म्हणून निवडून आल्यानंतर 14 गाव विकास समितीला सोबत घेऊन अनेक वेळा पाठपुरावा करून अधिवेशनात प्रश्न देखील उपस्थित केला होता. त्यावेळी तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी 14 गावं नवी मुंबई मनपात समाविष्ट करण्याची घोषणा केली होती.
मात्र काही तांत्रिक अडचणी येत असल्याने शासनाची अधिसूचना निघाली नव्हती. यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून पाठपुरावा सुरू होता. अखेर आज शासनाने गाव नवी मुंबईत समाविष्ट करण्याची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.
14 गावांच्या एकजुटीचा खऱ्या अर्थाने आज विजय झाला आहे. मी 14 गाव सर्व पक्षीय विकास समितीचे,नागरीकांचे अभिनंदन आणि राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचे मनापासून आभार व्यक्त करतो.
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील 27 गावांमध्ये मालमत्ता कराचा विषय प्रलंबित होता. त्यावर मार्ग काढत 2017 च्या दराप्रमाणे आता कराची आकारणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
या गावातील जी अनधिकृत बांधकामे आहेत ती संरक्षीत करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. नवी मुंबई महापालिका हद्दीत 14 गावांचा समावेश करण्याची भूमिपुत्रांची मागणी मान्य केली असून त्याबाबत अधिसूचना काढण्यात आली आहे. आता या गावांमध्ये नवी मुंबई महापालिकेप्रमाणे विकास कामे होतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
उल्हासनगर येथील अनधिकृत बांधकामे नियमाकुल करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. जीर्ण झालेल्या इमारतींचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करण्याबाबतचा निर्णय येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
वास्तविशारद संघटनेची देखील यावेळी बैठक घेण्यात आली. त्यानुसार ठाण्याच्या धर्तीवर इमारतींच्या उंचीबाबतचा नियम कल्याण डोंबिवली हद्दीत देखील लागू करावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील टेकडीवर संत सावळराम स्मारकासाठी जागा देण्याचा निर्णय झाला असून त्यासंदर्भातील कार्यवाही पूर्ण करावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. अखेर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे निर्णय जाहीर झाले असून आता सत्तेची समिकरण कशी बदलतात हे पहावे लागेल.
दहिसर, मोकाशी, वालिवली, पिंपरी, निघू, नावाळी, वाकळण, बाम्मली, नारीवली, बाळे, नागांव, भंडार्ली, उत्तर शीव, गोठेघर,
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.