मुंबई, ता. 18 : केंद्र सरकारकडून कोरोना बाधित रुग्णावर प्लाझ्मा थेरपी करण्याची परवानगी मिळाल्यानंतर नायर रुग्णालयात प्रयोग सुरू करण्यात आला. एका कोरोना बाधित रुग्णाला प्लाझ्मा दिल्यानंतर त्याच्या तब्येतीत सुधारणा झाली असून राज्यातील ही पहिलीच यशस्वी प्लाझ्मा थेरपी ठरली आहे. 'आयसीएमआर'च्या परवानगीने पुढील उपचारांबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
नायर रुग्णालयाचे रूपांतर कोविड रुग्णालयात केल्यानंतर सरकारी रुग्णालयांपैकी या रुग्णालयात प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग करण्याची परवानगी मिळाली होती. त्यानुसार नायर रुग्णालयात विशेष 'लॅब'ची निर्मिती करण्यात आली. केंद्र सरकारने प्लाझ्मा थेरपीला परवानगी दिल्यानंतर कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णांच्या रक्तातून प्लाझ्मा घेऊन अँटिबॉडीज तयार करण्याच्या थेरपीला सुरूवात झाली.
प्लाझ्मा थेरपीसाठी लागणारी प्रक्रिया पूर्ण होऊन कोरोना आजारातून बरे झालेल्या चार रुग्णांकडून प्लाझ्माचे चार युनिट कोरोनाच्या उपचारासाठी मिळवण्यात आले होते. त्यातून अँटीबॉडीज तयार करून ते कोरोना बाधितांच्या उपचारासाठी परिणामकारक सिद्ध होतील का याची तपासणी करण्यात येत होती. कोरोना आजारातून बरे झालेल्या चार रुग्णांच्या रक्ताच्या नमुन्यांची तपासणी अँटीबॉडीजसाठी सकारात्मक झाली. प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग इतर रुग्णांच्या उपचारांसाठी करून त्यांच्यावर उपचार करण्याचा निर्णय त्यानंतर घेण्यात आला. प्लाझ्मा थेरपीच्या माध्यमातून गंभीर कोरोना रुग्णांवर उपचार व्हावा त्यासाठी कोरोना आजारातून बरे झालेल्या व्यक्तींनी पुढे येऊन आपले प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन ही सरकार आणि पालिकेकडून करण्यात आले.
]कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णाच्या रक्तातून अँटीबॉडीज काढून त्या दुसऱ्या बाधित रुग्णाला देण्याचा प्रयत्न यशस्वी झाल्यानंतर प्रत्यक्ष प्रयोगाला सुरुवात झाली. नायर रुग्णालयातील एका 45 वर्षीय कोरोना बाधित रुग्णावर प्लाझ्मा थेरपीचा उपचार करण्यात आला. या रुग्णाला कोरोनासह इतर गंभीर आजार असल्याने त्याची तब्येत गंभीर होती. या रुग्णावर प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग केल्यानंतर त्याच्या तब्येतीत सुधारणा झाल्याचे दिसले. गेल्या आठवडाभर डॉक्टर त्याच्या तब्येतीवर लक्ष ठेऊन होते. त्याची तब्येत दिवसेंदिवस सुधारत असून त्याच्यातील कोरोना विषाणूंची मात्रा कमी होत असल्याची निरीक्षणे नोंदवण्यात आली. त्या रुग्णाला आणखी काही दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. ही निरीक्षणे देखील सकारात्मक आल्यानंतर या प्रयोगावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार उपचारास पात्र ठरलेल्या कोरोना रुग्णांना प्लाझ्मा थेरपी देण्यात येणार आहे. यासाठी रुग्णांची रक्त गट तपासणी करून त्यांचे प्लाझ्मा उपचार करण्यात येणाऱ्या रुग्णांशी जुळविण्यात येत आहेत. या प्रक्रियेसाठी लागणारे प्लाझ्मा फेरेसिस मशीन मुंबईतील नायर रूग्णालयात लावण्यात आले आहे. यामुळे कोरोना आजारापासून बरे झालेल्या रुग्णांना बोलावून प्लाझ्माचे विलगिकरण करण्याची प्रक्रिया जलद गतीने व प्रभावीपणे करणे शक्य होणार आहे . प्लाझ्मा थेरपीचा लाभ गंभीर प्रकारच्या रुग्णांना होणार असल्याचे सांगण्यात येते.
दिल्लीमध्ये प्लाजा थेरपीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर राज्यात देखील प्लाझ्मा थेरपी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे परवानगी मागण्यात आली होती. ही परवानगी मिळल्यानंतर या थेरपीला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. राज्यात 5 ते 6 टक्के कोरोना बाधित गंभीर रुग्ण आहेत. त्यांतील काही रुग्णांवर प्रयोजिक तत्वावर प्लाझ्मा थेरपीने उपचार करण्यात येणार आहेत.
लीलावती मधील पहिला प्रयोग अयशस्वी
कोरोना संसर्गावर अद्याप औषध सापडले नसल्याने प्लाझ्मा थेरपीचा विचार पुढे आला. दिल्ली मधील एका रुग्णावर केलेला प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग यशस्वी झाल्याने अनेक रुग्णालयांनी यासाठी 'आयसीएमआर'कडे परवानगी मागितली. 'आयसीएनआर'ने परवानगी दिलेल्या रुग्णालयांपैकी वांद्रे येथील लीलावती रुग्णालयाचा ही समावेश आहे. या रुग्णालयात बाधित रुग्णावर प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग करण्यात आला होता. मात्र प्लाझ्मा दिलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याने हा प्रयोग अयशस्वी झाला.
काय आहे प्लाझ्माा थेरपी?
प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनातून पूर्णपणे ठिक झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील 800 मिली रक्त घेतलं जातं. रक्ताचा वापर करून ॲण्टीबॉडीजयुक्त प्लाझ्मा वेगळे केले जातात. यानंतर हा प्लाझ्मा कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या शरीरात इंजेक्ट केला जातो. काही शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार, प्रभावी औषध किंवा लस नसतानाही प्लाझ्मा थेरपी कोरोनाच्या उपचारात प्रभावी ठरत असल्याचं म्हटलं आहे.
कोरोनामुळे ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचं निधन
प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. ज्या रुग्णावर प्लाझ्मा थेरपी करण्यात आली त्याच्या तब्येतीत कमालीची सुधारणा झाली आहे. 'आयसीएमआर'ने ठरवून दिलेल्या निकषांनुसार सर्व निरीक्षणे नोंदवण्याचे काम सुरू आहे. त्यांंच्या परवानगीने पुढील उपचारांबाबत निर्णय घेण्यात येईल. - डॉ.मोहन जोशी, अधिष्ठाता, बा. य. ल. नायर रुग्णालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.