JSW समूहाचे व्यवस्थापकीय संचालक(MD) सज्जन जिंदाल यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. एका 30 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी JSW ग्रुपचे अध्यक्ष आणि एमडी सज्जन जिंदाल यांच्याविरुद्ध बीकेसी पोलिस ठाण्यात आयपीसी कलम 376 (बलात्कार), 354 आणि 506 अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे.
एफआयआरनुसार, तक्रारकर्त्याने दावा केला आहे की, कथित घटना ही 24 जानेवारी 2022 मध्ये बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये जिंदाल यांच्या कार्यालयातील एका पेंटहाऊसमध्ये घडली. मात्र याबद्दल कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. त्यानंतर त्यांना कोर्टात धाव घ्यावी लागली. त्यानंतर कोर्टाने जिंदाल यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले होते.
सीएनबीसी-टीव्ही 18 च्या रिपोर्टनुसार, एफआयआरमध्ये तक्रारदार महिलेने म्हटले की, ती 8 ऑक्टोबर 2021 रोजी दुबईमध्ये सज्जन जिंदाल यांना पहिल्यांदा भेटली होती. प्रॉपर्टीशी संबंधित व्यवहार पुढे नेण्याच्या हेतूने दोघांमध्ये फोन नंबरची देवाणघेवाण करण्यात आली. काही भेटीनंतर जिंदालने तिच्याशी अनेकदा शारिरीक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला, पण तिने नकार दिला.
ऑक्टोबर 2021 ते जानेवारी 2022 या कालावधीत त्यांनी आणि जिंदाल यांनी अनेक ठिकाणी आणि अनेक शहरांमध्ये भेट होत राहिली, असा दावा तक्रारदाराने केला आहे. 24 जानेवारी 2022 रोजी ही महिला बीकेसीतील जिंदाल यांचे कार्यालय असलेल्या इमारतीच्या पेंटहाऊसमध्ये पोहोचली तेव्हा जिंदाल यांनी तिच्यावर बलात्कार केला, असेही तक्रारीत म्हटले आहे.
प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न
एफआयआरमध्ये म्हटले आहे की, 16 फेब्रुवारी 2023 रोजी जेव्हा महिलेने पहिल्यांदा पोलिसांकडे तक्रार केली तेव्हा जिंदाल यांच्या काही लोकांनी महिलेशी संपर्क साधला होता. त्यांनी हे प्रकरण मिटवून तक्रार मागे घेण्याची मागणी केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.