मोखाडा : जंगलात वणवा पेटला ; वन्य प्राण्यांची मानवी वस्तीकडे धाव

Fire in forest
Fire in forestsakal media
Updated on

मोखाडा :  सध्यस्धितीत पालघर जिल्ह्यातील मोखाडा (Mokhada) तालुक्यासह लगतच्या ठाणे आणि नाशिक जिल्ह्यात जंगलाला वणवा (Fire in forest) लागल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. वणवा कसा लागतो, कोण पेटवतो या बाबींवर खल होतो. मात्र, वणव्यामुळे जंगलातील दुर्मिळ वनौषधी, वनस्पती नष्ट होत आहे. ऊष्म्याचे प्रमाण वाढत आहे. नैसर्गिक पानवठे नष्ट होऊ लागले आहेत. वण्यप्राण्यांना (wild animals) भक्ष्य मिळणे कठीण होऊन त्यांचे वास्तव्य, अस्तित्व  आणि जीव धोक्यात आले आहेत. त्यामुळे जंगली श्वापदांनी मानवी वस्तीकडे, भक्ष्य शोधण्यासाठी मोर्चा वळवला आहे. त्याचा परिणाम म्हणून, पालघर, ठाणे आणि नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण जंगलपट्टी भागात बिबट्या (Leopard and tiger attack) तसेच वाघाने हल्ला केल्याच्या अनेक घटना घडत आहेत. 

Fire in forest
नवी मुंबई : आगरी-कोळी खाद्य संस्‍कृतीतील खेकडा शेती

पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड आणि वाडा तसेच ठाणे जिल्ह्यातील शहापुर हे तालुके तानसा अभयारण्याच्या काही भागासह सभोवताली संपुर्ण जंगलपट्टीने वेढलेलेले आहेत. या अभयारण्यात आणि जंगलात दुर्मिळ वनौषधी, वनस्पती तसेच पट्टेरी वाघ, बिबट्यांसह हजारो वन्य प्राणी, पशु आणि दुर्मिळ पक्षी आहेत. या अभयारण्यात आणि जंगलात वणवा पेटण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. तसेच मोखाडा तालुक्यालगत असलेल्या ठाणे आणि नाशिक जिल्ह्याच्या हद्दीत ही जंगलाला वणवां  लागल्याच्या घटना वर्षानुवर्षापासुन घडत आहेत. त्यामुळे या अभयारण्यात आणि जंगलात असलेल्या वनसंपदेसह वन्य प्राणी, पशु आणि पक्ष्यांचे जीव धोक्यात आले आहेत. या वणव्यांमुळे डोंगर बोडके होत असुन त्यामुळे या भागात ऊष्म्यातही वाढ झाली आहे. 

सध्यस्धितीत खरीप हंगामपुर्व मशागतीचा म्हणजे राब भाजणीचा हंगाम सुरू आहे. राब भाजणी करताना हवेने आग आटोक्यात न आल्याने, जंगलात वणवा पेटल्याच्या घटना घडतात. जंगला लगतच्या गाव, वाडीवस्तीतील नागरीक ससा, भेकर, रानडुक्करासह तितर, लाव्हरी या वन्य पशु, पक्षी आणि प्राण्यांची शिकार करतात. यावेळी जंगलात ऊन्हाच्या काहीलीने झाडा झुडपात विसावलेले वन्य, पशु, पक्षी आणि प्राणी वाघुरीत ( जाळीत ) अडकवण्यासाठी शिकारी झाडाझडती करतात.

Fire in forest
वाढत्या महागाई विरोधात युवा सेनेचे थाळी बजाओ आंदोलन

यावेळी काही शिकारी, शिकार सापडत नसल्याने,  जंगलाला वणवा लावतात. तर पुढील  पावसाळ्यात गवत जोमाने वाढावे म्हणून काही नागरीक जाणिव पुर्वक वणवा पेटवतात असा आरोप पर्यावरण प्रेमींकडुन केला जात आहे. नुकताच मोखाडा तालुक्यात वणवा लागल्याने खोडाळा भागातील नागरीकांना पट्टेरी वाघ, बिबट्या तसेच तरस आपला जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे नागरीकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. मात्र, या गंभीर घटनांकडे वन्यजीव संरक्षण आणि वनविभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. 

प्रतिवर्षी जंगलाला वणवा लागल्याच्या घटनांमुळे जंगलातील दुर्मिळ वनौषधी व वनसंपदा नष्ट होऊ लागली आहे. तसेच जंगलातील वन्यप्राणी जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळु लागले आहेत. अभयारण्य तसेच जंगलातील नैसर्गिक पानवठे ही नष्ट होऊ लागले आहेत. वन्य प्राण्यांचा निवारा हरपल्याने आणि भक्ष्य मिळत नसल्याने, या प्राण्यांनी जंगला लगतच्या मानवी वस्ती व शहरांकडे भक्ष्य शोधण्यासाठी मोर्चा वळवला आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहापुर, नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तसेच पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात मानवी वस्तीत शिरून, वाघाने तसेच बिबट्याने हल्ला केल्याच्या, दोन वर्षात अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे या घटना रोखण्यासाठी आणि वनसंपदेचे संवर्धन करण्यासाठी, वणव्यांच्या घटनांना आळा घालण्यासाठी, शासनाने वन्यजीव संरक्षण विभाग आणि वनविभागा मार्फत कठोर पावले व ऊपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत वन्य व निसर्ग प्रेमींनी व्यक्त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.