ठाणे : ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वाघबीळ येथील दिया मल्टिस्पेशालिटी कोव्हिड रुग्णालयातील तिसऱ्या मजल्यावरील औषध दुकानाला मंगळवारी (ता. 11) रात्री 11 च्या सुमारास आग लागली. ठाणे पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथक, अग्निशमन दल आणि क्विक रिस्पॉन्स टीमने तातडीने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवल्याने अनर्थ टळला.
दरम्यान, सुरक्षिततेचा उपाय म्हणून रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील (आयसीयू) दाखल असलेल्या चार रुग्णांना मुंबईतील भांडुप येथील भाटिया रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तब्बल 25 बेडची क्षमता असलेल्या ठाण्यातील दिया रुग्णालयात असलेल्या औषध दुकानाच्या वातानुकूलित यंत्रणेत शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाने वर्तविला आहे.
या आगीत औषध दुकानाचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, आगीची माहिती मिळताच दुर्घटना टाळण्यासाठी पालिका प्रशासनाने तातडीची उपाययोजना करून घटनास्थळी 5 रुग्णवाहिका, तसेच बाळकूम येथील कोव्हिड रुग्णालयातील बेड सज्ज ठेवले होते, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षप्रमुख संतोष कदम यांनी दिली.
-----------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.