Mumbai Fire News: मुंबईतील गोरेगावमधील इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग, ७ जणांचा होरपळून मृत्यू ४६ जण जखमी

मुंबईतील गोरेगावमधील इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली
Mumbai Fire News
Mumbai Fire NewsEsakal
Updated on

मुंबईतील गोरेगावमधील इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत १४ जण जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला तर ४६ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

आगीत ३० पेक्षा अधिक दुचाकी आणि ४ कार जळून खाक झाल्या आहेत. तसेच तळमजल्यावरील काही दुकानेदेखील जळून खाक झाली आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं असून, सध्या कुलिंगचं काम सुरु आहे.

पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग लागली. या घटनेत ७ जणांचा मृत्यू  झाला आहे. तर ४६ जण जखमी झालेत. तर ३० जणांना सुखरुप रेस्क्यू करण्यात आलंय. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे, सध्या कुलिंगचं काम सुरु आहे.   

Mumbai Fire News
मोठी बातमी! महाराष्ट्राचा विरोध झुगारून आलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा कर्नाटक सरकारचा प्रयत्न; ड्रोनद्वारे होणार सर्व्हे

मुंबईतील गोरेगाव पश्चिमेकडील जी रोडवरील जय भवानी नावाच्या इमारतीला पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास आग लागली. ग्राउंड प्लस पाच मजल्याची ही इमारत होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळ धाव घेतली. आग विझवण्यास सुरूवात केली.

इमारतीत अडकलेल्या ३० पेक्षा जास्त नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे. तर ४६ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये सात महिला आणि सात पुरुषांचा समावेश आहे. जखमींवर मुंबईतील ट्रॉमा केअर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या आगीत तळमजल्यावर वरील काही दुकाने आणि समोर पार्क असलेल्या गाड्या जळून खाक झाल्या आहेत. तर गाड्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.

Mumbai Fire News
Monsoon Update : मॉन्सून ४८ तासांमध्ये उत्तर महाराष्ट्रातून बाहेर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()