मुंबईः खोपोली जवळील साजगांव-ढेकू औद्योगिक वसाहतीतील आरकोस इंडस्ट्रीयल इस्टेटमधील मे जष्णोवा फार्मसिटीकल्स कंपनीत गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. आग लागल्यानंतर कंपनीत मोठे मोठे स्फोट होऊन भयानक परिस्थिती निर्माण झाली. या स्फोटकांमुळे कंपनी शेजारील वसाहतीतील एक महिला आणि कंपनीतील एक पुरुष असे दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले आहेत. या आगीमुळे शेजारील एस एस ट्यूब आणि पेन ट्यूब या कंपन्यांचे ही मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.
आगीचा लोट उठताना दिसताच आजू बाजूच्या गावांतील नागरिक प्रथम मदतीला धावून आले. दरम्यान खोपोली अग्निशमन दल, खोपोली पोलिस टीम, महसूल यंत्रणा, स्थानिक अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी सक्रिय गृपचे सदस्य, पाताळगंगा एमआयडीसी अग्निशमन दल, टाटा स्टील, रिलायन्स कंपनी, पनवेल महानगरपालिका अग्निशमन दलाच्या टीमने एकत्रित पणे तीन तास अथक प्रयत्न करून ही आग विझवून आटोक्यात आणली .
त्यानंतर संपूर्ण परिसर आणि कंपनीची पहाणी केल्यावर शेजारील वसाहतीमधील एक महिला, कंपनीमध्ये एक पुरुषाचा आगीत ओरफडून मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या दोघांची नावे आणि अन्य बाबींची माहिती घेतली जात आहे. सकाळी पाच वाजता ही आग लागली आणि साडे आठ वाजेपर्यंत आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. घटनेची तीव्रता आणि दखल घेत रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे , स्थानिक उप पोलिस अधीक्षक संजय शुक्ला, प्रांत अधिकारी शीतल परदेशी, तहसीलदार इरेश चप्पलवार यांच्या सहित रायगड जिल्हा औद्योगिक सुरक्षा विभागाचे अधिकारी, पर्यावरण विभागाचे अधिकारी घटना स्थळी दाखल होऊन त्यांनी सर्व घटनेची माहिती घेत सविस्तर पहाणी केली.
आग कशामुळे लागली, स्फोट कसे घडले आणि दोघांच्या मृत्यूला जबाबदार कोण या संदर्भात सविस्तर चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी केली आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती सर्व उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. संबंधित दोषी व्यवस्थापन विरोधात ही कठोर कारवाई केली जाणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
आग एवढी मोठी होती की , पाच सात किमी अंतरावरून आगीचे लोट दिसत होते.
आगीमुळे झालेल्या स्फोटामुळे शेजारील कंपन्या, रहिवासी घरे यांचे मोठे नुकसान झाले आहे. परिसरातील दहा किमी अंतरावर स्फोटांनी हादरा बसला आणि भूकंप झाला की काय अशी भीती निर्माण झाली.
--------------------------------
(संपादनः पूजा विचारे)
Fire broke out pharma company Khopoli three hours later two people death
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.