Mumbai Fire News: गोरेगावातील आगीची घटना अतिशय दुर्दैवी; मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त करत जाहीर केली मदत

मुंबईतील गोरेगावमधील इमारतीच्या पार्किंगमध्ये आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली
Mumbai Fire News
Mumbai Fire NewsEsakal
Updated on

मुंबईतील गोरेगावमधील इमारतीच्या पार्किंगमध्ये आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला तर ४६ जण जखमी झाल्याची माहिती आहे. तर ३० जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, या संपुर्ण परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहे. महापालिका आयुक्त आणि पोलिस आधिकारी यांच्या संपर्कात आहे, असं एकनाथ शिंदे म्हणालेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. केद्रींय गृहमंत्री अमित शाह यांनी आयोजित केलेल्या बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले, माझी तेथील पोलिस, आधिकारी यांच्याशी चर्चा सुरू आहे. मी माहिती घेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार कागद आणि कापडामुळे आग लागली अशी प्राथमिक माहिती आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे, असंही मुख्यमंत्री पुढे म्हणालेत.

दरम्यान, याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या परिवाराला ५ लाख रूपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे. तर जखमींच्या उपचारांचा संपुर्ण खर्च सरकार उचलणार असल्याचे देखील शिंदे यावेळी म्हणाले आहेत.

Mumbai Fire News
Mumbai Fire News: मुंबईतील गोरेगावमधील इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग, ७ जणांचा होरपळून मृत्यू ४६ जण जखमी

दरम्यान या भीषण आगीत ३० पेक्षा अधिक दुचाकी आणि ४ कार जळून खाक झाल्या आहेत. तसेच तळमजल्यावरील काही दुकानेदेखील जळून खाक झाली आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे.

पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग लागली. या घटनेत ७ जणांचा मृत्यू  झाला आहे. तर ४६ जण जखमी झालेत. तर ३० जणांना सुखरुप रेस्क्यू करण्यात आलंय. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे.

Mumbai Fire News
Cabinet Expansions: नवरात्रीत मंत्रिमंडळ विस्ताराची वाटली जाणार खिरापत? तिन्ही पक्षांना विस्ताराची गरज मान्य

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ट्विट

गोरेगावच्या उन्नत नगर येथील एसआरएच्या जय भवानी इमारतीला भीषण आग लागून झालेल्या दुर्घटनेत काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यात काही लहान मुलांचाही समावेश आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून त्यात जीव गमवावा लागलेल्या नागरिकांप्रती मी माझी सहवेदना व्यक्त करतो.

या आगीच्या घटनेबाबत मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांकडून मी वेळोवेळी माहिती घेत असून मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर तसेच मुंबई उपनगरांचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देण्याचे निर्देश दिले आहेत.

या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मृतांच्या कुटूंबियांना शासनाकडून ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली असून, जखमी नागरिकांवर सरकारी खर्चाने वैद्यकीय उपचार करण्यात येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.