Mumbai Fire : मुंबईत आगीच्या वाढत्या घटना अग्निशमन दलापुढे डोकेदुखी

गेल्या पंधरवड्यात मुंबईत आगीच्या लागोपाठ दुर्घटना घडत आहेत. या आगीमध्ये जीवित हानी झाली नसली तरी मोठी वित्तहानी झाली आहे.
Mumbai Fire
Mumbai FireEsakal
Updated on

मुंबई - गेल्या पंधरवड्यात मुंबईत आगीच्या लागोपाठ दुर्घटना घडत आहेत. या आगीमध्ये जीवित हानी झाली नसली तरी मोठी वित्तहानी झाली आहे. बहुतांश आगी शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे निदर्शनास आले असले तरी अग्निसुरक्षा नियमांचे पालन न केल्यामुळेच आगी लागत असल्याचे अग्निशमन दलाचे म्हणणे आहे. मात्र शहर आणि उपनगरातील वाढत्या आगीच्या वाढत्या दुर्घटना अग्निशन दलापुढे डोकेदुखी ठरत आहे.

गिरगाव मध्ये गोमती भवन बिल्डिंग, गोरेगाव पश्चिम येथील आसमी इडस्ट्रियल इस्टेट, अंधेरी पूर्व येथील ट्रान्स रेसीडन्सी, चेंबूर टिळक नगर येथील न्यू हॉल, सांताकृझ पश्चिम येथील जुहू रेसिडेन्सी आदी घटना या पंधरा दिवसात घडल्या आहेत. सातत्याने या इमारती घडल्या आहेत. सतत आगीच्या घटनांनी अग्निशमन दलाची डोकेदुखी वाढली आहे.

मुंबईत गेल्या काही वर्षात इमारतींचे पूनर्विकास प्रकल्प पूर्ण झाले काही प्रकल्प सुरू आहेत. टोलेजंग इमारती उङ्या रहात आहेत. शॉपिग मॉल्स, हॉटेल्स उभी राहिली आहेत. त्यात आगी लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. अग्निसुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष होत आहे. गेल्या वर्षभरात आगीच्या 4725 घटना घडल्या असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत आगीच्या घटनांमध्ये सात टक्के टक्क्याने वाढ झाल्याचे अग्निशमन दलाने सांगितले.

दिवाळीत आगी मोठ्या प्रमाणात लागल्याचे दिसून आले. मुंबईत 80 टक्के आगी या शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे निदर्शनास आले आहे. अग्निशमन दलाने या नियमांचे पालन केले आहे की नाही याची चाचपणी करणे गरजेचे आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. उत्तुंग इमारतींच्या आगी विझविण्यासाठी अद्ययावत साधनांची कमतरता असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उत्तुंग इमारतींच्या आगी राम भरोसे असल्याचे दिसून येत आहे.

मुंबई उच्च न्यायालयानेही अग्निशमन दलाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असल्याचे आदेश दिले होते. आगीच्या घटना टाळण्यासाठी फायर ऑडिट व अग्निशमन यंत्रणा काटेकोर असणे आवश्यक असल्याचे अग्निशमन दलाने म्हटले आहे.

  • वर्षभरातील आगी - 4725

  • मुंबईतील एकूण अग्निशमन केंद्रे - 34

  • छोटी अग्निशमन केंद्रे - 19

  • अग्निशामक- 1686

  • चालक - 483

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.