विरार: शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर असलेला समाज म्हणजे 'तृतीयपंथी' समाज. या तृतीयपंथी समाजातील लोकांना मोठ्या प्रमाणात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. गेल्या कित्येक वर्षांपासून समाजात स्थान मिळावे, यासाठी या तृतीयपंथीयांचा संघर्ष सुरू आहे. त्यांना अद्याप समाजाने मानाचे स्थान दिलेले नाही. त्यांना प्रत्येक ठिकाणी भेदभाव आणि वेगळ्या नजरेने पाहिले जाते. त्यांना कमी समजले जाते. या समाजातील लोकांना शिक्षणाचा अधिकार मिळत नाही. पण, तृतीयपंथी समाज हा सुशिक्षित व्हावा यासाठी या समाजातर्फे आता शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील वसई या भागात राज्यातील पहिली तृतीयपंथीयांच्या शिक्षणासाठी ट्रान्सजेंडर शाळा सुरू करण्यात आली असून या समाजाला शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्याचे काम यामुळे होणार आहे. (First ever Transgender School in Maharashtra started in Vasai Palghar)
आता तृतीयपंथी समाजात मोठ्या प्रमाणात बदल घडत आहेत. आणि प्रत्येक क्षेत्रात हा समाज आपली महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडत आहे. आता या समाजाने एक पाऊल पुढे टाकले आहे. तृतीयपंथी समाज हा सुशिक्षित व्हावा यासाठी या समाजातर्फे शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि तो अमलातही आणण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील वसई या भागात राज्यातील पहिली तृतीयपंथीयांच्या शिक्षणासाठी ट्रांसजेंडर शाळा सुरू करण्यात आली आहे.
या समाजाबद्दल इतर समाजात पसरलेल्या भेदभाव दूर करण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेची सुरुवात मेहंदी अली आणि श्री महाशक्ती चॅरिटेबल ट्रस्टच्या रेखा त्रिपाठी यांनी केली आहे. या शाळेला 'किन्नर विद्यालय' असे नाव देण्यात आले असून, आतापर्यंत 24 विद्यार्थ्यांनी यात प्रवेश घेतला आहे. सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद आहेत. मात्र शाळा सुरू होण्याचे आदेश मिळाल्यानंतर येथेही विद्यार्थ्यांना शिकावयास सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे या शाळेत शिकवणारे सर्व शिक्षक हे सुद्धा तृतीयपंथीच आहे.
ही शाळा सुरू झाल्याने या समाजातील लोकांना रोजगार सुद्धा उपलब्ध होऊ शकणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ही पहिलीच शाळा असेल जिथे तृतीयपंथियांना शिक्षण दिले जाणार आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे, या शाळेत शिक्षक देखील याच समाजाचे असून मोठ्या प्रमाणात सुशिक्षित आहेत. त्यामुळे आता या समाजातील लोकांना शिक्षण घेता येणार ही एक सकारात्मक बाब आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.