मुंबई : केंद्र आणि राज्य सरकारच्या संघर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अहमदाबाद ते मुंबई बुलेट ट्रेनचा ड्रीम प्रोजेक्ट अडचणीत सापडला आहे. या मार्गासाठी ठाणे, पालघरमध्ये जिल्हात भूसंपादनाचे काम धिम्या गतीने सुरु आहे. त्यामुळे जर राज्यात भूसंपादनाला उशीर होत असेल तर पहिल्या टप्प्यात गुजरातमधील काम पुर्ण करण्याचा विचार रेल्वे बोर्डाचा आहे. त्यामुळे अहमदाबाद मुंबई मार्गावरच्या कॉरिडॉर ऐवजी पहिल्या टप्प्यात बुलेट ट्रेन अहमदाबाद ते वापीपर्यंत धावण्याची शक्यता आहे. रेल्वे बोर्डाचे चेअरमन यादव यांनी ही माहिती दिली आहे.
महाराष्ट्रात बुलेट ट्रेनसाठीच्या भूसंपदानाला उशीर होत असल्यामुळे, हा मार्ग दोन टप्प्यात पुर्ण करण्याचा विचार रेल्वे बोर्डाचा असल्याचा विनोद यादव यांनी म्हटले आहे. एकाच टप्प्यात बुलेट ट्रेनचे काम पुर्ण व्हावे अशी भारतीय रेल्वेची इच्छा आहे असेही ते म्हणाले. यासंदर्भात रेल्वे मंत्रालयाची महाराष्ट्र सरकारशी सातत्याने चर्चा सुरु आहे. पुढच्या चार महिन्यात 80 टक्क्यापेक्षा भूसंपादनाचे काम पुर्ण होईल असे आश्वासन महाराष्ट्र सरकारने दिले आहे. जर या काळात भूसंपादनाचे काम पुर्ण झाले तर आम्ही निविदा काढू आणि गुजरात आणि महाराष्ट्रातील बुलेट ट्रेनचे काम एकाच टप्प्यात करु असंही ते म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सरकार अस्तित्वात आल्यापासून बुलेट ट्रेनच्या भूसंपदनाला जाणीपुर्वक विरोध होत असल्याची भावना केंद्र सरकारची आहे. ठाण्यात बुलेट ट्रेन स्थानकासाठी जागा देण्याचा प्रस्ताव ठाणे पालिकेत फेटाळण्यात आला आहे. कांजुरमार्ग मेट्रो कारशेडवरुन राज्य आणि केंद्र सरकारमध्ये मोठा संघर्ष पेटला आहे. बुलेट ट्रेनच्या कामाला खो घालून केंद्र सरकारची कोंडी करण्याचा विचारही सरकारचा आहे असं राजकीय विश्लेषक म्हणतायत.
first phase bullet of bullet train might run only in gujrat due to delay in land acquisition
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.