मुंबई : महिलेच्या घशात अडकलेले माशाचे हाड (fish bone stuck in jaw) यशस्वीरीत्या बाहेर काढण्यात केईएम रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे. ४६ वर्षीय महिला गेले १५ दिवस घशात हाड अडकलेल्या अवस्थेत होती. घसा दुखत असल्याने तिला अन्नही गिळता येत नव्हते. घशात हाड अडकले असल्याची जाणीवही तिला न झाल्याने १५ दिवस ती द्रवरूप आहारावरच (water food) होती. मात्र, प्रकृती खालावल्याने तिला केईएम रुग्णालयात (kem hospital) दाखल करण्यात आल्यानंतर तिच्यावर उपचार करण्यात आले.
बदलापूरमधील रहिवासी हुस्नबानो निजामुद्दीन शेख मानेला सुज आल्याची तक्रार घेऊन केईएम रुग्णालयात आल्या होत्या. त्यांना अन्नही गिळणे कठीण होत होते. निदानानंतर त्यांच्या घशात माशाचे हाड अडकल्याचे स्पष्ट झाले. सहाय्यक प्राध्यापक आणि कान-नाक-घसा शस्त्रक्रिया विभागाच्या युनिट प्रमुख डॉ. नीलम साठे म्हणाल्या, ‘शेख यांच्या मानेच्या क्ष-किरण तपासणीत माशाचे हाड दिसले. १५ दिवसांपूर्वी त्यांनी मासा खाल्ला होता. दुसऱ्या दिवसापासून त्यांना वेदना होत होत्या.
त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून मानेतील २.८ सेमी फिशबोन काढण्यात आले.’ अशी प्रकरणे दुर्मिळ आहेत. माझ्या आतापर्यंतच्या कार्यकाळात मी असे दोन प्रकार पाहिले आहेत. पहिल्या प्रकरणात, एका मुलाने गिळलेले माशाचे हाड त्याच्या छातीत गेले आणि त्याच्या रक्तवाहिन्यांना दुखापत झाली. जास्त रक्तस्राव झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. मात्र आताच्या प्रकरणात असे झाले नाही, असेही डॉ. साठे म्हणाल्या.
जीवावर बेतू शकले असते!
२.८ सेमीचे हाड हुस्नबानो शेख यांच्या घशात अडकले होते. सुदैवाने ते एखाद्या मोठ्या रक्तवाहिनीला टोचले नव्हते. अन्यथा गंभीर रक्तस्राव होऊन त्यांच्या जीवावर बेतू शकले असते. हाड तीक्ष्ण असल्याने शरीराच्या इतर भागाला इजा होऊ शकली असती. त्याचा परिणाम शरीरातील इतर अवयवांवरही झाला असता, असे डॉ. नीलम साठे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.