Fishing: मच्छीमारांनाही बसला मुंबईमध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा फटका

fishing  mumbai
fishing mumbaisakal
Updated on

अवकाळी पावसाच्या भीतीने शेतकऱ्यांच्या धास्तीत भर पडली आहे. बोर्डी परिसरातील शेतकरी रब्बी हंगामाच्या तयारीत असताना पावसामुळे रोपांची लागवड करण्यासाठी वातावरण अनुकूल राहणार नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे. समुद्रातील धोका लक्षात घेऊन मच्छीमार बांधवांनी मासेमारी बंद करून किनाऱ्यावर येण्याचा निर्णय घेतला आहे.

खरीप हंगामातील भाताचे पीक घेतल्यानंतर बोर्डी परिसरातील अनेक शेतकरी पिकाची मळणीचे काम उरकून रोजगारासाठी स्थलांतर करतात. शेतकऱ्यांकडे पाण्याची सुविधा उपलब्ध आहे, ते रब्बी हंगामातील पीक घेण्याच्या कामात व्यग्र असतात. मोठ्या प्रमाणात वेलवर्गीय भाज्या व फळभाज्या घेण्याचा शेतकऱ्याचा कल असतो. नुकतीच दिवाळी आनंदात साजरा करून शेतकरी वर्ग जमिनी नांगरणे व अन्य मशागत करण्याकडे कामाला लागला आहे. मात्र आज (ता. २६) पहाटेपासून बोर्डी आणि परिसरात सूर्यदर्शन झालेले नाही.

fishing  mumbai
Whale Fish : रत्नागिरीत व्हेल माशाची तब्बल 2.75 कोटींची उलटी जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, सिंधुदुर्गातील चौघांना अटक

पावसाची रिपरिप सुरू झाल्यामुळे शेतात ठेवलेली भाताची उडवी झाकताना शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. हवेत किंचित गारवा निर्माण झाला होता. परंतु अकरा वाजण्याच्या सुमारास पुन्हा ढगांचा गडगडाट सुरू झाला होता. दुपारी बारा वाजता पावसाला सुरुवात झाली. बोर्डीमध्ये ढगाळ वातावरण होते व काळाकुट्ट अंधार पडला होता. पश्चिम भागातून ढगांचा गडगडाट सुरू झाल्याने पावसाचे प्रमाण वाढून शेतीचे मोठे नुकसान होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

fishing  mumbai
Dombivali Fish Market : शुक्रवारी डोंबिवलीतील मासळी बाजार बंद

सुक्या मासळीचे नुकसान
दिवाळीनंतर मच्छीमारांनी समुद्रातील मासेमारीला सुरुवात केली होती. नोव्हेंबरमध्ये मच्छीमार बांधव मासळी सुकवण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करतात, परंतु अचानक सुरू झालेल्या पावसाने सुकवण्यासाठी ठेवलेली मच्छी खराब झालीच, परंतु पुढील काही दिवसात मासे सुकवणे अडचणीचे झाले आहे.

प्रक्रिया उद्योगदेखील धोक्यात
नोव्हेंबरपासून बोर्डी परिसरात पिकलेल्या फळांना वाळवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात सुरू केला जातो. या व्यवसायात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो. परंतु पावसामुळे प्रक्रिया उद्योगदेखील धोक्यात येणार, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

fishing  mumbai
Fish For Mental Health : मानसिक आरोग्यासाठी लाभदायी आहेत मासे, जाणून घ्या फायदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.