ठाणे : गोरगरिबांचे रुग्णालय म्हणून ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे (Thane district hospital) पहिले जाते. त्यात या रुग्णालयात जिल्ह्यातीलच नव्हे तर, पालघर जिल्ह्यातूनही रुग्ण उपचारासाठी येत असतात. या रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना (Poor patients) उच्च व उत्तम दर्जाचे उपचार (Best treatment facilities) मिळावे यासाठी जिल्हा रुग्णालयाचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल (Super specialty hospital) मध्ये रूपांतर करण्यात येत आहे. सुरुवातीला ५७४ खाटांच्या बेडला हिरवा कंदील अगोदरच सरकारने दिला होता.
मात्र, भविष्यातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता, नियोजित खाटांची संख्या वाढवून ९०० खाटांच्या प्रस्ताव शासनास्तरावर पाठविण्यात आला. त्यास अखेर मान्यता मिळाली असून जिल्हा रुग्णालयाच्या बांधकामासाठी ५२७ कोटींच्या रक्कमेस प्रशासकीय मान्यता देखील मिळाली आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचा मार्ग मोकळा झाला आहे.
ठाणे जिल्ह्याचे झपाट्याने नागरिकीकरण होत आहे. दिवसेंदिवस जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून रुग्णालयावर ताण वाढत आहे. त्यात काहीवेळा गंभीर आजाराकरिता रुग्णांना उपचार मिळत नाही आणि रूग्णांची दुसऱ्या रुग्णालयात नेण्याची धावाधाव सुरू होते. याची गांभीर्याने दाखल घेत, या सर्व घटना टाळण्यासाठी सिव्हिल रुग्णालयाचे रुपडं पालटलं जात आहे. दोन वर्षांपूर्वी सिव्हिल रुग्णालयाचे रूपांतर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये करण्याला राज्य शासनाने मंजुरी दिली होती. त्यावेळी हॉस्पिटल बांधण्यासाठी सरकारने ३१४ कोटींचा निधी दिला आहे.
मात्र, नंतर कोरोनाच्या महामारीमुळे पुढील गोष्टींना विलंब झाला. परंतु, रुग्णालय आणखी मोठं करण्याचा प्रस्तावाबाबत विचारविनिमय सुरू आहे. खाटांची संख्या वाढवून ते आणखी सुसज्य केले जाणार आहे. आणि याबाबतच्या प्रस्तावाला लवकरच मंत्रालतातून शिक्कामोर्तब केला जाईल अशी माहिती जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी सांगितले होते. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्याला सरकारने परवानगी देत, ५७४ खाटांचे हॉस्पिटल बांधण्याचे ठरले होते.
मात्र, भविष्यातील जिल्ह्यातील वाढत्या नागरीकीकरण व विस्तारीकरणामुळे वाढणाऱ्या लोकसंख्येचा विचार करता, खाटांची संख्या वाढवणे क्रमप्राप्त आहे. रुग्णांना चांगले उपचार मिळावेत यासाठी रुग्णालय प्रशासनाने विचार करून वास्तू उभी रहाण्यापूर्वी खाटांची संख्या ९०० करण्यात आली आहे. त्यानुसार नवा प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. या प्रस्तावामध्ये २०० सुपर स्पेशालिटी, २०० लहान मुलं, डिलिव्हरी आणि महिला आणि ५०० खाटा जनरल रुग्णासाठी ठेवण्याचे सुचविले होते. यात जनरल खाटा मध्ये आर्थो, डोळे, रक्ताचे आजार, ज्येष्ठ नागरिक, डायलिसिस,आयसीयू नाक, कान घसा आदी सर्वांचा समावेश असणार आहे. हॉस्पिटल उभारणीचा खर्च वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.
दरम्यान, शुक्रवारी जिल्हा सामान्य रुग्णालयच्या ९०० बेडसच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बांधकामासाठी अखेर ५२७ कोटींच्या रक्कमेस प्रशासकीय मान्यता देखील मिळाली आहे. यामध्ये सेवा रुग्णालय व परिचारिका प्रशिक्षण केंद्र आणि वसतीगृह इमारतींचा देखील समावेश असणार आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचा मार्ग मोकळा झाला आहे.
"जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीत दोन बेसमेंट, तळमजला, सोबतच टेरेसवर हेलिपॅड बांधले जाणार आहे. रुग्णाला इमर्जन्सीमध्ये आणायचे झालेच तर एअर ऍम्ब्युलन्सने आणण्याची सोय केली जाणार आहे. तसेच नव्या प्रस्तवा सादर केल्यानंतर शासनाकडून काढण्यात आलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले. त्यानुसार या नव्या प्रस्तावाला शासनाकडून प्रशासकीय मान्यता देखील प्राप्त झाली आहे. त्यामुळे लवकरच रुग्णालयाच्या कामास सुरुवात होणार आहे."
- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे
अटी व शर्ती :-
* काम सुरु करण्यापुर्वी नमुना नकाशा, मांडणी नकाशा तसेच विस्तृत नकाशास वास्तुविशारदांकडून मंजूरी घेऊनच सुरु करावे.
* ढोबळ स्वरुपात धरण्यात आलेल्या तरतूदीबाबत काम करतेवेळी विस्तृत अंदाजपत्रक करुनच काम हाती घ्यावे.
* प्रत्यक्ष काम करतेवेळी पर्यावरण विभागाकडून करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार कार्यवाही करण्यात यावी.
* पर्यावरण विभागाची व NBWL च्या स्थायी समितीची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.
* स्थानिक ग्रामीण नगर विकास संस्थेच्या संबंधित नियमानुसार बांधकाम परवानगी तसेच भोगवटा प्रमाणपत्र मिळविण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग यांची राहील.
* नियोजित जागा ताब्यात असल्याचे प्रमाणपत्र प्राप्त करुन कामाच्या निविदा सूचना प्रसिध्द करण्यात याव्यात.
* सदर काम मंजूर रक्कमेत पुर्ण होईल याची दक्षता घेण्यात यावी. तसेच सदर काम उपलब्ध निधी मधून करण्यात यावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.