मुंबईतून आणखी पाच ड्रग्ज पेडलर्सला NCBकडून अटक

मुंबईतून आणखी पाच ड्रग्ज पेडलर्सला NCBकडून अटक
Updated on

मुंबई: मुंबईतील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं (एनसीबी) 5 ड्रग्ज पेडलर्संना अटक केली आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांना या पेडलर्संच्या घरातून ड्रग्जचा साठा मिळाला आहे. एनसीबीनं हे ड्रग्ज जप्त केलेत. एनसीबीनं मुंबईत शनिवार आणि रविवार या दोन दिवशी अनेक ठिकाणी छापेमारी केली. या छापेमारीत 165 ग्रॅम मेफेड्रोन, 20 ब्लॉट्स (0.5 ग्रॅम) एलएसडी, 8 ग्रॅम MDMA/ एक्स्टसी गोळ्या जप्त केल्या. एनसीबीनं या छापेमारी संदर्भात एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. त्यात या छापेमारीची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

27 मार्चला एनसीबीनं मुंबईतील माओ चायनिज रेस्टारंट, माहिम या ठिकाणी छापेमारी केली. या छापेमारीत एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी 105 ग्रॅम मेफेड्रॉन (Commercial Quantity) जप्त केले असून यावेळी एका महिलेसह दोन जणांना एनसीबीनं ताब्यात घेतले. दरम्यान 27 मार्चला एनसीबीनं आणखी एका ठिकाणी छापेमारी केली. ही छापेमारी एव्हरेस्ट वर्ल्ड बिल्डिंग, ढोकली, ठाणे (पश्चिम) येथे मारली. यावेळी अधिकाऱ्यांनी 8ग्रॅम एक्स्टसी / एमडीएमए टॅब्लेट आणि 20 ब्लॉट्स (0.5 ग्रॅम) एलएसडी (Commercial Quantity) आणि एका भारतीय नागरिकांना ताब्यात घेतलं. या छापेमारीनंतर एनसीबीनं 26/2021  या  तक्राराअंतर्गत गुन्हा दाखल केला असल्याचं निवेदनात म्हटलं आहे. 

याव्यतिरिक्त एनसीबीनं फ्लॅट क्रमांक 1203, मिलेनियम हेरिटेज, अंधेरी (डब्ल्यू) येथे छापा टाकला. या छाप्यात 57 ग्रॅम मेफेड्रोन (Commercial Quantity) जप्त केले आणि एका महिलेसह दोघांना ताब्यात घेण्यात आले. 

या छापेमारी दरम्यान अशी एक बाब उघड झाली की,  ड्रग्ज रॅकेट चालवताना अल्पवयीन मुलींचा पेडलर म्हणून वापर केला जात आहे. एनसीबी आता पेडलर ओळखण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे. त्यासाठी काही बाबींवर काम केलं जात आहे. तसंच पुढील तपास सुरु असल्याचं एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी सांगितलं.

Five Narcotics peddlers arrested Mumbai by Narcotics Control Bureau

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()