कोरोनाला रोखणारं कॉकटेल मुंबईत उपलब्ध, किंमत ६० हजार रुपये

सोमवारीच हे औषध भारतात लाँच झालं आहे.
Roche Farma India
Roche Farma India
Updated on

मुंबई: कोरोनावरील उपचारांमध्ये आता अँटिबॉडी कॉकटेलचा (cocktail drug) समावेश झाला आहे. भारतात कोरोना उपचारांसाठी (corona treatment) उपलब्ध झालेलं हे नवीन औषध आहे. अँटिबॉडी कॉकटेल (antibody cocktail) बाजारात येऊन पाचच दिवस झाले आहेत. मुंबईत आतापर्यंत कोरोनाच्या पाच रुग्णांना या अँटिबॉडी कॉकटेल औषधांचे डोस देण्यात आले आहेत. (Five patients in Mumbai receive Rs 60,000 drug cocktail drug)

वांद्रयाच्या लिलावती रुग्णालयात उपचार घेणाऱ्या चाळीशीच्या दोन रुग्णांना मोनोक्लोनल अँटिबॉडीज कॉकटेल औषध देण्यात आलय. दुसऱ्या दोन रुग्णांपैकी एक चाळीशीचा असून एक रुग्णाचे वय ७४ वर्ष आहे. सानपाड्याच्या MPCT हॉस्पिटलमध्ये या दोन रुग्णांवर उपचार सुरु आहेत. चेंबूरच्या सुराना हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या एका ७९ वर्षीय वृद्ध महिलेला सुद्धा हे अँटिबॉडी कॉकटेल औषध देण्यात आले. या वृद्ध महिलेला डायबिटीस, हायपरटेन्शन असे आजार आहेत.

या कॉकटेल औषधाच्या प्रत्येक डोसची किंमत ६० हजार रुपये आहे. रॉची औषध कंपनीने सोमवारी अँटिबॉडी कॉकटेल औषध भारतात लाँच केले. कोरोनामुळे प्रकृती गंभीर होऊ शकते, अशा रुग्णांना हे औषध दिले जाईल. मोनोक्लोनल अँटिबॉडीज प्लाझ्मा थेरेपीची जागा घेणारं औषध आहे.

Roche Farma India
सोनू जलान बेटिंग प्रकरणात नवा टि्वस्ट, साक्षीदाराची पलटी

मोनोक्लोनल अँटिबॉडीज ही महागडी उपचार पद्धती आहे. IV मार्फत रुग्णांना या औषधाचा डोस दिला जातो. या मध्ये तासाभराचा वेळ लागतो. पण इतका खर्च करणं सर्वसामान्य, मध्यमवर्गाला परवडणारं नाही, असं सार्वजनिक रुग्णालयातील डॉक्टरनं सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()