उरणमधील ५ हजार खारफुटींना नवा अंकुर; सागरी हिरवळ फुलू लागली

Kandalvan in uran
Kandalvan in uransakal media
Updated on

उरण : तालुक्यातील पागोटे येथील कांदळवनातील (Kandalvan) पाच हजारांपेक्षा अधिक झाडांची कत्तल झाली होती. मात्र किमया साधत या झाडांच्या खोडांना पुन्हा पालवी फुटली आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींनी (Environmentalist) आनंद व्यक्त केला. सुमारे अडीच वर्षांपूर्वी पागोटे येथील कांदळवनाची कटाई केली होती. यामुळे हा परिसर ओसाड दिसत होता; परंतु आता पुन्हा या क्षेत्रात सागरी हिरवळ (Sea Greenery) फुलू लागल्याने आश्चर्याचा सुखद धक्का बसल्याचे नेटकनेक्ट फाऊंडेशनचे संचालक बी. एन. कुमार (B.N.Kumar) यांनी सांगितले. ते श्री एकवीरा आई प्रतिष्ठानच्या नंदकुमार पवार यांच्यासोबत उरण कांदळवन क्षेत्र बचावाची मोहीम राबवत आहेत.

Kandalvan in uran
पनवेल परिवहन कार्यालय सुसाट; तब्बल ३५४ कोटी ३१ लाख रुपयांचा महसूल जमा

निसर्गात मुळातच उभारी घेण्याची क्षमता असते, कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय निसर्ग पुन्हा बहरत असल्याचे कुमार यांनी सांगितले. पायाभूत विकास प्रकल्पांच्या नावाखाली उरण तालुक्यातील कांदळवने आणि पाणथळींचा विनाश सुरू असल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली. उरण, खारघर, उलवे आणि नवी मुंबईतील काही ठिकाणी असलेली कांदळवने ही संवर्धनासाठी वन विभागाकडे सुपूर्द करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने सप्टेंबर २०१८ दरम्यान दिले होते.

मात्र तसे न झाल्याने या हरित पट्ट्याचा बेसुमार विनाश झाल्याची माहिती नंदकुमार पवार यांनी दिली. त्यानंतरही काही भागातील सागरी वनस्पतींचे भूभाग संथ गतीने सिडकोकडून वन विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले. मात्र मोठे भूभाग वन विभागाकडे सुपूर्द करण्याची प्रक्रिया अपूर्णच राहिली. आजही कांदळवनातील हजारो झाडे नवी मुंबई सेझकडेच असल्याने भविष्यात मोठ्या प्रमाणावर विनाश उद्‌भवू शकतो, या मुद्याकडे कुमार यांनी लक्ष वेधले.

वास्तविक खारफुटींची कत्तल झाल्याचे वन विभागाने स्पष्ट केले. तसेच नवी मुंबई सेझने पाच हजारहून अधिक खारफुटी रुजवण्याविषयी उरण तहसीलदारांना पत्राद्वारे सूचित करण्यात आल्याचे कुमार यांनी सांगितले. द्रोणगिरी सागरी मार्गावर असलेल्या पागोटेच्या दोन्ही बाजूला कांदळवनांचा ऱ्हास झाला आहे. एकीकडे सुमारे १० हेक्टरहून अधिक क्षेत्रात असलेल्या कांदळवनात अमानुष कत्तल करण्यात आली, तर दुसरीकडे ट्रकभर राडारोडा आणून पाणथळ बुजविण्याचे प्रकारही झाले. या अर्धमेल्या वनस्पतींनी आता पुन्हा उभारी घेतली असून त्याचे श्रेय भरतीच्या पाण्याला जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.