- नितीन बिनेकर
मुंबई - समुद्राच्या कुशीत विसावलेली गावे, शहरांना जलमार्गाने मुंबईला जोडण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून पारंपरिक फेरी बोटी करत आहे. मात्र,आता रोरो आणि सागरी सेतूमुळे या पारंपरिक फेरी बोटीवर अवलंबून असणार पाच हजार लोकांवर उपासमारीचे वेळ येणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने आम्हा नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी फेरी बोट चालक मालकांकडून करण्यात येत आहेत.
देशातील सर्वात जास्त २२ किलोमीटर लांबीचा समुद्री मार्गावर ‘अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू’ लवकरच मुंबईकरांचा सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे अवघ्या २० मिनिटांत मुंबई ते नवी मुंबई अंतर प्रवाशाना गाठता येणार आहे. मात्र, या सागरी सेतूमुळे भाऊचा धक्का आणि गेट वे ऑफ इंडियावर ब्रिटिश काळापासून सुरु असेल्या पारंपरिक फेरी बोटी चालकांचे मोठे नुकसान होणार आहे.
यापूर्वी रोरो बोटीमुळे त्याच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यातच आता सागरी सेतूमुळे त्यांच्या पारंपरिक फेरी बोटी चालकांचा व्यवसाय संकट सोडल्याने राज्य सरकराने मुंबई आणि उपनगरातील पारंपरिक बोट चालक मलाकांना आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे.
मुंबईत भाऊचा धक्का ते रेवस, भाऊचा धक्का ते उरण, भाऊचा धक्का ते मोरा, भाऊचा धक्का ते एलिफन्टा, आणि गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा दरम्यान पारंपरिक फेरी बोटी आहेत. मुंबई विभागात १४५ फेरी बोटी अनेक वर्षांपासून आपली सेवा नागरिकांना देत आहे. आतापर्यत शासनाची काही मदत नसताना प्रवासी सेवा म्हणून आम्ही आपली सेवा बजावत आहे.
कोव्हिड काळात सुद्धा डाक्टर आणि नर्सेसला नि;शुल्क सेवा दिली आहे. मात्र, आता सागरी सेतू सुरु झाल्यानंतर आमचे प्रवासी सरळ सेतूवरून वाहन घेऊन जातील. त्यामुळे वर्षानुवर्षे फेरी बोट चालविणाऱ्याचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे बोटी चालकांवर उपासमारीची वेळ येणार आहे.
६० टक्के प्रवासी घटणार -
मुंबई विभागात १४५ फेरी बोटी असून प्रत्येक बोटी मागे पाच कामगार आहे. या कामगारांची संख्या ७२५ आणि इतर कामगार मिळून १२०० लोकांच्या कुटूंबीयांवर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे जवळ जवळ ५ हजार लोक प्रभावित होणार आहे. सागरी सेतू सुरू झाल्यानंतर जवळजवळ ६० टक्के प्रवासी आमचे कमी होणार असल्याची भीती फेरी बोट मालकांनी सकाळकडे व्यक केली आहे.
अगोदरच आधुनिक बोटीमुळे आमच्या व्यवसायावर मोठा परिणाम पडलेला आहे. त्यातच आता सागरी सेतू सुरू झाल्यानंतर पारंपरिक फेरी बोटीचे प्रवासी कमी होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने आम्हाला नुकसान भरपाई द्यावी.
- शराफत मुकादम, सचिव, मुंबई जलवाहतूक संस्था
सागरी सेतूमुळे फेरी बोटीचे प्रवासी संख्या ६० टक्के कमी होणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षपणे आमचे मोठे नुकसना होणार आहे. राज्य सरकारने आम्हाला आर्थिक मदत करावीत.
- किफायत मुल्ला, सचिव, गेट वे एलिफंटा जलवाहतूक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.