Tarapur MIDC Blast : तारापूर एमआयडीसीमधील कंपनीत भीषण स्फोट! पाच कामगार जखमी
Tarapur MIDC Blast : रासायनिक पदार्थ अंगावर पडल्याने कामगारांचा चेहरा आणि हात पाय भाजले असून त्यांना उपचारासाठी औद्योगिक क्षेत्रातील खाजगी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले आहे.
बोईसर : तारापूर औद्योगिक वसाहत क्षेत्रातील एका रासायनिक कारखान्यामध्ये अपघात होऊन पाच कामगार जखमी झाल्याची घटना (ता.२०)घडली आहे. जखमी कामगारांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात (टी एम आर सी)तुंगा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.