'Dunki’ Flight: 'डंकी'चा संशय! फ्रान्समध्ये थांबवलेलं विमान 276 प्रवाशांसह मुंबईत लँड; इतर 24 जणांचं काय?

हे विमान पहाटे ४ वाजता मुंबई विमानतळावर उतरलं, पॅरिसच्या विमानतळावरुन विमानानं दुपारी २.३० वाजता उड्डाण केलं होतं.
Flight with Indians held in France over human trafficking lands in Mumbai
Flight with Indians held in France over human trafficking lands in Mumbai
Updated on

मुंबई : अभिनेता शाहरुख खान याच्या 'डंकी' सिनेमाच्या कथेसारखी घटना सध्या काही भारतीय नागरिकांसोबत घडली आली आहे. बहुसंख्य भारतीयांसह ३०० प्रवाशांचं एक विमान फ्रान्सनं तब्बल चार दिवस रोखून ठेवलं होतं. हे विमान आज (मंगळवार) पहाटे ४ वाजता मुंबई विमानतळावर उतरलं आहे. यामुळं डाँकी रुट अर्थात डंकी प्रक्रियेची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. (Flight with Indians held in France over human trafficking lands in Mumbai)

Flight with Indians held in France over human trafficking lands in Mumbai
माजी खासदार राठोडांनी मांडलेला 'नऊ'चा फॉर्म्युला जरांगेंनी नाकारला; नेमकं काय आहे फॉर्म्युल्यात?

काय आहे प्रकार?

फ्रान्सच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, विमानानं मुंबईच्या दिशेने उड्डाण करतेवेळी २७६ प्रवाशी यामध्ये उपस्थित होते. तर दोन अल्पवयीन मुलांसह २५ लोकांनी फ्रान्स सरकारनं शरण द्यावं अशी इच्छा व्यक्त करणारे अर्ज भरुन दिल्यानं त्यांना फ्रान्समध्ये थांबवण्यात आलं आहे. जेव्हा हे विमान फ्रान्सच्या वेट्री विमानतळावर दाखल झालं त्यावळी त्यात ३०३ प्रवाशी होते. यांपैकी ११ जण अल्पवयीन होते. (Marathi Tajya Batmya)

मानवी तस्करीच्या संशयावरुन फ्रान्सनं हे विमान रोखून ठेवलं होतं. त्यानंतर त्यातील सर्व प्रवाशांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली आहे. विमानानं वेट्री विमानतळावरुन उड्डाण केल्यानंतर भारतीय दुतावासानं ट्विट करुन याची माहिती दिली होती. यात म्हटलं होतं की, फ्रान्स सरकार आणि वेट्री विमानतळ प्रशासनानं हा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढल्यानं त्यांचे आभार.

रोमानियाच्या लिजेंड एअरलाइन्सच्या ए३४० विमानानं दुबईहून निकारागुआसाठी उड्डाण केलं होतं. हे विमान तांत्रिक बिघाडामुळं फ्रान्सच्या वेट्री एअरपोर्टवर उतरवण्यात आलं होतं. याच दरम्यान फ्रान्स सरकारला सूचना मिळाली होती की, या विमानातून मानवी तस्करी केली जात आहे. यानंतर फ्रान्सनं हे विमान थांबवून ठेवलं होतं.

Flight with Indians held in France over human trafficking lands in Mumbai
Weather Update: तामिळनाडूसह 'या' राज्यात आज पुन्हा पावसाची शक्यता; महाराष्ट्रासह उत्तर भारतात कडाक्याची थंडी

फ्रान्सच्या कोर्टात सुनावणी

फ्रान्स सरकारनं प्रवाशांना ताब्यात घेऊन मानवी तस्करीच्या अँगलनं या प्रकरणाचा तपास केला. त्यानंतर रविवारी फ्रान्समधील कोर्टानं या प्रकरणी सुनावणी घेतली. यावेळी कोर्टानं प्रवाशांना काही प्रश्न विचारले. फ्रान्स मीडियाच्या माहितीनुसार, प्रवाशांमध्ये अनेकजण हिंदी आणि तमिळ भाषिक नागरिक होते. यानंतर कोर्टानं विमान परत भारताकडं पाठवण्याचे आदेश दिले. तसेच या प्रकरणात अनियमिततेचा हवाला देत सुनावणी रद्द केली. (Latest Marathi News)

Flight with Indians held in France over human trafficking lands in Mumbai
JDS Politics: केंद्रात भाजपशी युती अन् महाराष्ट्रात पडली उभी फूट; 'या' पदाधिकाऱ्यांनी केला समाजवादी पक्षात प्रवेश

विमानतळावरच प्रवाशांसाठी केली बिछान्याची सोय

लिजेंड एअरलाइन्सच्या वकिलांनी याप्रकरणी बाजू मांडताना सांगितलं की कंपनीनं काहीही चुकीचं काम केलेलं नाही. त्यामुळं आम्ही चौकशीत सहकार्य करत आहोत. त्यानंतर भारतीय दुतावासातील अधिकारीही वेट्री विमानतळावर पोहोचले आणि त्यांनी भारतीय प्रवाशांची विशेष काळजी घेतली. त्यांच्यासाठी विमानतळावरच आरामासाठी बिछान्याची सोय करण्यात आली, तसेच त्यांच्या खानपानाचीही व्यवस्था करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.