कल्याणच्या काही भागात पूरस्थिती, उल्हास नदीने ओलांडली धोक्याची पातळी

काही भागात रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे.
कल्याणच्या काही भागात पूरस्थिती, उल्हास नदीने ओलांडली धोक्याची पातळी
Updated on

कल्याण: कल्याण (kalyan) पूर्व-पश्चिम मधील काही भागात रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. बुधवार रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे वालधुनी आणि उल्हास नदीच्या (ulhas river) बाजूला असलेल्या परिसरामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. कल्याणमध्ये काही भागात विद्युत पुरवठा खंडित (Power failure) झाल्याने नागरिकानां रात्र अंधारात काढावी लागली. बुधवारी रात्री पासून मुसळधार पावसाच्या (heavy rain) हजेरीने वालधुनी आणि उल्हास नदीच्या पात्रात झपाट्याने पावसाचे पाणी वाढले असून त्या परिसर मध्ये असलेल्या सखल भागात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. (Flood situation in few parts of kalyan ulhar river flowing over danger mark dmp82)

रस्त्यावरील वाहतूक सेवा ही ठप्प झाली आहे. कल्याण पूर्व मधील खडेगोळवली नाला तुडुंब वाहत असून त्या परिसर मधील नागरिकांच्या घरात पाणी घुसले आहे. अनेक जण घरं सोडून नातेवाईकाकडे गेलेत, तर काहींनी पालिकेच्या शाळांचा सहारा घेतला असून त्यांना मदत करत असल्याची माहिती प्रभाग क्षेत्र अधिकारी सुधीर मोकल यांनी दिली ,

रायगड कॉलनी, कैलास नगर, खडेगोळवली आदी परिसरात नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याची माहिती स्थानिक सामाजिक कार्यकर्ते राजेश अंकुश यांनी दिली. सकाळी साडे सहाच्या सुमारास विठ्ठल वाड़ी रेल्वे स्थानक जवळील नाल्याचे पाणी रस्त्यावरून वाहू लागल्याने वाहतूक बंद करण्यात आल्याची माहिती कल्याण पूर्व वाहतूक विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र शिरसाठ यांनी दिली.

कल्याणच्या काही भागात पूरस्थिती, उल्हास नदीने ओलांडली धोक्याची पातळी
घाट भागात जोरदार पाऊस; 24 मेल, एक्स्प्रेस रेल्वे गाड्या रद्द

केडीएमटी डेपो पाण्याखाली ....

कल्याण नगर महामार्गावर असलेला आणि वालधुनी नदी काठी असलेला केडीएमटी डेपो पाण्याखाली गेला होता. पाणी वाढत असल्याने 15 बसेस बाहेर काढण्यात आल्या तर डेपो मध्ये पाणी वाढत असल्याने कर्मचारी वर्गाने प्रेम ऑटो पेट्रोल पंप सुरक्षित ठिकाणी उभे होते .

कल्याण पूर्वेकडील अशोक नगर, शिवाजी नगर पाण्यात

कल्याण पूर्व  वालधुनी नदीच्या बाजूला गेली अनेक वर्षे पुराच्या परिस्थितीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आज मात्र मध्यरात्री अचानकपणे पाऊस थांबला असताना नदी पात्रात पाण्याची पातळी वाढली. इथले स्थानिक लोक मिळेल ते घरातले सामान घेऊन आपला मार्ग काढत स्थलांतरित होत आहेत. खूपच भयावह परिस्थिती निर्माण झाली असल्याची प्रतिक्रिया  स्थानिक नागरिक निखिल टोकेकर यांनी दिली .

दरम्यान वालधुनी नदी शेजारील  अशोक नगर आणि शिवाजी नगर मध्ये मुसळधार पावसाने अनेकांच्या घरात पाणी घुसले असून 300 हुन अधिक नागरिकानां त्या परिसर मधील पालिका शाळेत स्थलांतर करण्यात आले असून पुढील उपाययोजना सुरू असून रात्रभर अग्निशमन दलाचे पथक ही परिसरात असल्याची माहिती प्रभाग क्षेत्र अधिकारी वसंत भोंगाडे यांनी दिली .

कल्याण-नगर महामार्ग बंद ....

मुसळधार पावसाने उल्हासनदी, वालधुनी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. शहाड पुला जवळील परिसर पाण्याखाली गेल्याने कल्याण मोहने रोड वरील आणि शहाड पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती .

कल्याणच्या काही भागात पूरस्थिती, उल्हास नदीने ओलांडली धोक्याची पातळी
अटक टाळण्यासाठी राज कुंद्राकडून घेतली लाच, पोलीस अधिकाऱ्यावर गंभीर आरोप

कल्याण ग्रामीण जलमय ...

कल्याण तालुक्यातील टिटवाळा, मांडा,खडवली,कांबा, म्हारळ या भातसा व उल्हास नदिलगत परिसरात  तसेच सखल भागात पाणी भरले आहे. बाधित नागरिकांसाठी मदत कार्य चालू आहे.उल्हास नदीवरील 'रायते पुल' व भातसा नदीवरील 'खडावली पूल'तसेच म्हारळ जवळील कल्याण नगर महामार्गावर पाणी आल्याने वाहतुकीसाठी बंद करणेत आला असून पुलावरील पाणी पातळीत वाढ होत असल्याची माहिती कल्याण तहसिलदार दिपक आकडे यांनी दिली .

पाणी पुरवठा बंद ...

उल्हास नदीच्या धोक्याची पातळी ओलांडून गेल्याने नदी शेजारी असलेल्या कल्याण डोंबिवली महानगर पालिका हद्दीत पाणी पुरवठा करणारे जलशुद्धीकरण केंद्र आणि उदचनकेंद्रात पाणी शिरल्याने कल्याण ग्रामीण, डोंबिवली पूर्व पश्चिम, कल्याण पश्चिमच्या काही भागात पाणी पुरवठा बंद करण्यात येणार असून नदीचे पाणी ओसरल्यावर पुढील उपायोजना करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे पाणी पुरवठा विभाग कार्यकारी अभियंता राजीव पाठक यांनी दिली .

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()