Flood Water : शहापुर तालुक्यात 223 घरात पुराचे पाणी; 91 जणांचे स्थलांतर

पुरास कारणीभूत ठरणारे अतिक्रमण हटविण्यास सुरवात
Flood Water
Flood Wateresakal
Updated on

शहापुर : शहापुर तालुक्यात 7 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे चार ठिकाणी पुराचे पाणी घरात घुसून 223 घरातील जिवनावश्यक वस्तू व मालमतेचे नुकसान झाले असून 91बाधित रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष तथा तहसीलदार कोमल ठाकूर यांनी दिली असून नुकसान झालेल्या घरांचे व मालमतेचे पंचनामे करण्यात आले आहेत.

Flood Water
Nashik Crime News : निवाणे ग्रामपंचायतीमधील अपहारप्रकरणी माजी सरपंचासह दोघांना पोलिस कोठडी

शहापुर नगरपंचायत हद्दीतील गुजराती बाग येथील (75),गुजराती नगर(35),वासिंद सृष्टी फार्म परिसर(81) व आवळे(32)येथील घरात पुराचे पाणी घुसून जीवनावश्यक वस्तू व मालमतेचे नुकसान झाले आहे तर गुजराती बाग(4),वासिंद सृष्टी फार्म परिसर(49)व वाफे येथील (38)रहिवाशांना सुरक्षीतस्थळी हलविण्यात आले आहे.गुजराती बाग येथील11 दुकानाचे नुकसान झाले असून 12 वाहनांचे नुकसान झाले आहे.माहुली ते सावरोली दरम्यान असणाऱ्या आवळे गावातील पुलाचा काही भाग वाहून गेला आहे.

भारंगी नदीच्याया पात्रातील अतिक्रमणामुळे नदीला पूरआल्याने इमारतीत पाणी घुसून रहिवाशांचे मालमतेचे नुकसान व वाहने वाहून गेली होती त्यामुळे येथील रहिवाश्यानी अतिक्रमण तोडून टाकण्यासाठी रास्ता रोको केला होता. महापुरास कारणीभूत ठरणारे अतिक्रमणे हटविण्याचे काम सुरू करण्यात आले असल्याने रहिवाशयानी समाधान व्यक्त केले आहे. नुकसानग्रस्त कुटूंबाना तात्काळ मदत मिळावी अशी मागणी कळंभे ग्राप उपसरपंच अविनाश किरपण व सदस्य स्वप्नील भोईर यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com