Flower News: फुलांच्या किमती कडाडल्या; मोगरा सोळाशे; तर चाफ्याने ओलांडली हजारी

flower news akola
flower news akolaesakal
Updated on

Flower News गणेशोत्सवाची धूम पालघर नगरीत पाहावयास मिळत आहे. या उत्सवानिमित्त फुलांची बाजारपेठ फुलली आहे. अशात आरास आणि पूजेसाठी फुलांची मागणी वाढत आहे; मात्र हवामानात होत असलेल्या बदलामुळे फुलांची आवक कमी झाली आहे.

परिणामी गणेशोत्सवात वापरल्या जाणाऱ्या मोगरा, जास्वंद, चाफा, शेवंती या फुलांचे भाव वाढले आहेत. यात मोगऱ्याचे दर सोळाशे रुपये किलो आणि चाफ्याने प्रतिशेकडा हजारी ओलांडली आहे.

flower news akola
Hibiscus Flower : जास्वंदाचं फूल वाढवेल तुमच्या त्वचेचं सौंदर्य

पालघर जिल्ह्यात फुलशेती मोठ्या प्रमाणात होते. मुंबई, ठाणे यासह आजूबाजूच्या परिसरात असणाऱ्या मंडईत येथील फुले मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी जातात. येथील जास्वंद, चाफा, शेवंती, मोगरा यासह विविध फुलांना गणेशोत्सवात मागणी वाढत आहे. सार्वजनिक मंडळांसह खासगी गणपतीला फुलांची सजावट केली जात आहे.

गणरायाला आवडते जास्वंद फूल देखील वाहिले जाते. त्यापासून हारदेखील तयार केले जात आहेत. तसेच जिल्ह्यातील शेकडो मंदिरातदेखील फुलांची मागणी आहे. त्यामुळे बाजारपेठा सुगंधी फुलांनी दरवळू लागल्या आहेत; परंतु हवामानात झालेला बदल पाहता फुलांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे मागणीप्रमाणे पुरवठा हे समीकरण बिघडले आहे.

लहरी हवामानाचा परिणाम फुलशेतीवर झाला आहे. त्यामुळे उत्पादनावर परिणाम दिसून येत आहे. मोगरा, चाफा व जास्वंद फुलांना गणेशोत्सवात मागणी असते; मात्र आवक कमी असल्याने दरावर त्याचा परिणाम झाला आहे.

- भूषण भोईर, फूल व्यावसायिक
flower news akola
Flower Farming : कांद्याने रडवले पण ‘शेवंती’ ने सावरले..! गौरव वाघ यांचा फुलशेतीचा यशस्वी प्रयोग

दुर्वांची मागणी वाढली

श्रींना दुर्वा अत्यंत प्रिय असल्याने गणेशोत्सवात दुर्वांची मागणी वाढू लागली आहे. मोकळ्या जागेत निर्माण होणाऱ्या दुर्वा काढण्यासाठी महिला, पुरुष वर्ग काम करत असून त्या बाजारपेठेत विकत आहेत. त्यामुळे त्यांच्या हाताला रोजगार मिळत आहे.

आणखी दरवाढीची शक्यता

पालघर जिल्ह्यात गौरी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गौरी पूजनासाठी फुलांची मागणी वाढू लागली असल्याने किमती वाढण्याची शक्यता आहे.

फुलांचे दर (आठ दिवसांपूर्वी)

मोगरा - १६०० रुपये किलो (६००)

शेवंती - १४० रुपये किलो (४०)

चाफा - १००० रुपये शेकडा (४००)

जास्वंद - २५० रुपये शेकडा (६०)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.