दिलेला शब्द पाळा, दगा देऊ नका! ‘या’ माजी मंत्र्याचा भाजपला टोला

दिलेला शब्द पाळा, दगा देऊ नका! ‘या’ माजी मंत्र्याने हाणला भाजपला टोला
दिलेला शब्द पाळा, दगा देऊ नका! ‘या’ माजी मंत्र्याने हाणला भाजपला टोला
Updated on

नवी मुंबई : जग हे विश्वासावर चालते. आजही गुजराती, मारवाडी यांचे विविध मार्केटवर प्राबल्य आहे. त्यांचे एकमेकांत व्यवहार होतात. हे सर्व विश्वासावरच चालते. मराठी माणसांनीही गुजराती, मारवाडी समाजाचा आदर्श घेणे गरजेचे आहे. आमच्या मित्रांनी दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे राजकारण फिरले. म्हणून दिलेला शब्द पाळा, दगा देऊ नका, असा टोला भाजपचे नाव न घेता खासदार अरविंद सावंत यांनी घणसोली येथील कोकण महोत्सवाच्या उद्‌घाटनप्रसंगी लगावला.

घणसोली, सेक्‍टर चार येथील पोलिस चौकीजवळील एका भूखंडावर २१ ते ३१ डिसेंबरदरम्यान, पाचव्या कोकण महोत्सव भरवण्यात आले आहे. कोकण कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष व शिवसेना उपविभागप्रमुख राजू गावडे यांच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्‌घाटन खासदार अरविंद सावंत यांनी केले. तेव्हा ते उद्‌घाटक म्हणून बोलत होते. 

या वेळी शिवसेना उपशहरप्रमुख सुरेश सकपाळ, उपशहरप्रमुख मंगेश साळवी, नगरसेविका दीपाली सकपाळ, समाजसेविका श्रुखंला गावडे व आयोजक राजू गावडे उपस्थित होते. सलग दहा दिवस चालणाऱ्या या कोकण महोत्सवात २५ विविध व्यवसायांचे स्टॉल, सांस्कृतिक कार्यक्रम, गायन, नाटक, रेकॉर्ड डान्स स्पर्धा, डबलबारी भजन स्पर्धा, जुन्या नवीन गाण्यांचा आविष्कार, दशावतारी नाटक व खेळ पैठणीचा अशा विविध कार्यक्रमाची जंत्री नागरिकांना अनुभवायला मिळणार असल्याची माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष सचिन आसबे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.