बापरे बाप! 15 वर्षीय मुलीच्या पोटात फुटबॉलच्या आकाराचा ट्युमर; वोक्हार्ट रूग्णालयातील यशस्वी शस्त्रक्रिया

बापरे बाप! 15 वर्षीय मुलीच्या पोटात फुटबॉलच्या आकाराचा ट्युमर; वोक्हार्ट रूग्णालयातील यशस्वी शस्त्रक्रिया
Updated on


मुंबई :  एका 15 वर्षीय मुलाच्या फुफ्फुसातून 16 सेंटिमीटरचा ट्यूमर (गाठ) काढण्यात मिरारोड येथील वोक्हार्ट रूग्णालयातील डॉक्टरांना यश मिळाले आहे. आश्चर्याची  म्हणजे फुटबॉलच्या आकारा एवढी ही गाठ  होती. तिचे वजन 1.5 किलो होते.  

भायखळा मध्ये राहणारा प्रतीक बरकडे (15) या मुलाच्या उजव्या छातीच्या पोकळीत गाठ होती. तिला सॉलिटरी फ्रायबर ट्यूमर असे म्हणतात. या गाठीमुळे छातीत दुखणे, दम लागणे, खोकला आणि श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागला होता. ही कोव्हिडची लक्षणे असल्याने कुटुंबियांना तातडीने वोक्हार्ट रूग्णालय गाठले. याठिकाणी छातीचा सीटीस्कॅन करण्यात आला. या चाचणी अहवालात फुफ्फुसात गाठ असल्याचे निदान झाले. हा ट्यूमर काढण्यासाठी शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय असल्याचे डॉक्टरांना सांगितले.

मिरारोड येथील वोक्हार्ट रूग्णालयातील कार्डिओव्हस्कुलर आणि थोरॅसिस सर्जन डॉ. उपेंद्र भालेराव यांच्या नेतृत्वाखाली अन्य डॉक्टरांच्या टीमने ही शस्त्रक्रिया केली आहे.

सध्या कोरोनाच्या भितीमुळे अनेक जण रूग्णालयात उपचारासाठी येणे टाळत आहेत. त्याचप्रमाणे प्रतिकवरही वेळेवर उपचार न झाल्याने त्याच्या वयाबरोबर ट्यूमर वाढत होता. तो फुटबॉलच्या आकारा एवढा मोठा होता. या गाठीमुळे फुफ्फुसे, श्वसननलिका व हदय यावर विपरित परिणाम होऊ लागला होता. यासाठी शस्त्रक्रिया करणे  गरजेचे होते.  
- डॉ. उपेंद्र भालेराव,
थोरॅसिस सर्जन

मुलाला श्वास घेण्यास त्रास होता.  त्यामागील कारण आम्हाला समजू शकले नाही. फुफ्फुसात ट्यमूर असल्याचे ऐकल्यावर  धक्काच बसला. पण वोक्हार्ट रूग्णालयातील डॉक्टरांनी वेळीच निदान व शस्त्रक्रिया करून माझ्या मुलाचे प्राण वाचवले आहे.
-मयूर बरकडे,
प्रतिकचे वडील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.