Dombivali News: शिवसेना शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी एककिडे होत असताना दुसरीकडे ठाकरे गटाने देखील तोच कित्ता गिरवायला सुरुवात केली आहे. भिवंडी पूर्वेतील ठाकरे गटाचे माजी आमदार रुपेश म्हात्रे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
म्हात्रे यांनी येथुन समाजवादी पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपला अर्ज मागे देखील घेतला. मात्र तरीही ठाकरे गटाने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेली टिका त्यांना भोवल्याची चर्चा आहे.