Mumbai News: मुंबई हादरली! भाजप माजी खासदाराच्या पुतण्याने संपवलं जीवन, इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून मारली उडी

Mumbai News: भारतीय जनता पक्षाच्या माजी खासदाराच्या 21 वर्षीय पुतण्याने मंगळवारी मुंबईत राहत्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पोलिसांनी ही माहिती दिली.
Suicide
SuicideESakal
Updated on

उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील भाजपचे माजी खासदार संगम लाल गुप्ता यांच्या पुतण्याने मुंबईत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अंधेरीतील एका इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. आत्महत्येचे कारण शोधले जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सागर राम कुमार गुप्ता असे मृताचे नाव आहे. सागर राम कुमार गुप्ता 21 वर्षांचे होता. आणि तो यूपीच्या प्रतापगड जिल्ह्यातील माजी भाजप खासदार संगम लाल गुप्ता यांचा पुतण्या होता. सागर हा अभियांत्रिकीचा विद्यार्थी असून तो अंधेरी (पूर्व) येथील अंबुजवाडी भागात असलेल्या हरी दर्शन भवनच्या सातव्या मजल्यावर राहत होता. संगम लाल गुप्ता याचा मुंबईत व्यवसाय आहे. त्याचं कुटुंबही तिथेच राहतं.

Suicide
Baba Siddique Murder Case : वरातीत हवेत गोळीबार हाच मारेकऱ्याचा अनुभव... बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा

मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास सागर कॉलेजमधून घरी परतला. घरातील कोणाशीही न बोलता त्याने थेट सहाव्या मजल्यावर जाऊन 'डक्ट एरिया'मधून उडी मारली. संगम लाल गुप्ता यांचा पुतण्या सागर राम कुमार गुप्ता याने अंधेरी येथील इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. सोसायटीच्या आवारात काहीतरी पडल्याचा आवाज ऐकून लोक बाहेर आले. लोकांनी पाहिले असता सागर रामकुमार गुप्ता रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता.

लोकांनी तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. त्यांनी फ्लॅटमध्येही तपासणी केली. सागरची कोणतीही सुसाइड नोट सापडली नसून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी अंधेरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक उमेश म्हणाले, “मृतक हा उत्तर प्रदेशातील भाजपचे माजी खासदार संगम लाल गुप्ता यांचा पुतण्या होता. सागर गुप्ता डिप्रेशनमध्ये होता की नाही आणि या पाऊलामागील संभाव्य कारण काय आहे हे जाणून घेण्यासाठी पोलीस त्याच्या कॉलेजमधील मित्रांची चौकशी करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.