Trishna Vishwasrao: "मुख्यमंत्री इर्शाळवाडीत डोंगर चढून गेल्यानं प्रभावित"; माजी नगरसेविकेचा शिवसेनेत प्रवेश

तृष्णा विश्वासराव यांची उपनेतेपदी वर्णी
Trishna Vishwasrao_Eknath Shinde
Trishna Vishwasrao_Eknath Shinde
Updated on

मुंबई : माजी नगरसेविका तृष्णा विश्वासराव यांनी आज आमदार सदा सरवणकर आणि आमदार मनीषा कायंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इर्शाळवाडीत केलेल्या कामानं प्रभावित होऊन आपणं शिवसेनेत दाखल होण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं आहे. (Former corporator of Mumbai Trishna Vishwasrao joins Eknath Shinde Shiv Sena)

Trishna Vishwasrao_Eknath Shinde
Manipur Violence: मणिपूर शांती अन् विकास अनुभवत होता, पण कोर्ट...; शहांचं विरोधकांना पत्र

तृष्णा विश्वासराव म्हणाल्या, शेवटी आज मी निर्णय घेतला. मला शाखेतून त्रास देण्यात आला. मी पहाडा एवढं काम केलं आहे. मी मुख्यमंत्री शिंदे यांचं काम पहिले आहे. इर्शाळवाडीत पहाटे मुख्यमंत्री पोहोचले आणि पाच तास डोंगर चढून गेले. इथल्या अनाथ मुलांना त्यांनी दत्तक घेतलं हे मोठं काम त्यांनी केलं, यामुलं प्रभावित होऊन मी पक्ष प्रवेश करत आहे.

Trishna Vishwasrao_Eknath Shinde
Pune News: शेतात जायला रस्ताच नाही; महिलेनं हेलिकॉप्टरसाठी सरकारकडं मागितली परवानगी

बिघडलेली गणितं सुधारली

तृष्णा विश्वासराव यांच्या पक्ष प्रवेशानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. शिंदे म्हणाले, तृष्णाताई या तब्बल सात वेळा निवडून आल्या आहेत आणि आज शिवसेनेत पक्ष प्रवेश करत आहेत, त्यांचे नाव अभिमानणार घेतले जाते.

वर्षभरपूर्वी आपण भाजप-शिवसेना युतीचे सरकार स्थापन केले आणि लोकांच्या मनातील सरकार स्थापन केले. निवडणुकांवेळी सरकार स्थापन होताना गणितं बिघडली, ती गणितं आम्ही वर्षभरपूर्वी सुधारून सरकार स्थापन केलं.

Trishna Vishwasrao_Eknath Shinde
Manipur Internet: मणिपूरमध्ये ब्रॉडबॅन्डवरील बंदी उठवली पण...; 'या' कडक अटी पाळाव्या लागणार

तृष्णा विश्वासराव यांची उपनेतेपदी वर्णी

पण आता कुठेही निधी कमी पडणार नाही याची मुख्यमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे. तृष्णा विश्वासराव यांची उपनेतेपदी वर्णी करत आहोत. त्यामुळं आता कामाला लागा, बाकीच्यांनाही कामाला लावा. काही लोक बोलतील त्याकडं दुर्लक्ष करायचं.

आता ते बोलतील कचरा गेला, शेवटी तेच राहतील, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी उद्धव ठाकरेंवर टीकाही केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.