मुंबई : मुंबईत आठवडाभरात रुग्णसंख्या लक्षणीय (corona patients increases) वाढली आहे. रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याने मुंबईतील सक्रिय रुग्णांमध्ये (Mumbai corona active patients) दुपटीने वाढ झाली आहे. 1 हजारांवरुन सक्रिय रुग्णांची संख्या आता 4 हजांरावर (four thousand patients) पोहोचली आहे. यातून रुग्ण वाढीचा अंदाज लावता येऊ शकतो. (Four thousand corona patients in Mumbai in just ten days)
विशेष म्हणजे, एका आठवड्यांपूर्वी 18 डिसेंबर रोजी मुंबईत 1940 सक्रिय रुग्ण होते.ही संख्या आता दुप्पट होऊन 4,735 पर्यंत पोहोचली आहे. जर परिस्थिती अशीच कायम राहिली तर लवकरच मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या पाच हजारांचा टप्पा गाठेल.
पुढचे दोन-तीन आठवडे संयमाचे
आता जे रुग्ण आढळत आहेत त्यात 90 टक्के डेल्टाचे आणि 10 टक्के ओमायक्रॉनचे रुग्ण आहेत. पुढचे दोन ते तीन आठवडे काळजीपूर्वक निरीक्षण करण्याची गरज आहे. रुग्ण यंत्रणेवर जर ताण आला तर तिसरी लाट आली आहे असे म्हणता येईल. आपण सध्या अशा परिस्थितीत आहोत की रुग्णसंख्या वाढतच आहे. अशा परिस्थितीत लोकांनी निर्बंध पाळले नाही तर आणि असाच ताण राहिला दोन ते तीन आठवड्यात तिसरी लाट येईल. यात एक गोष्टी चांगली आहे की मृत्यूदर एवढा नाही. सुरुवातीला मृत्यू दर नसतोच पण, याचा ताण रुग्णसंख्येवर येतोच. त्यातच वयस्कर, बाधित रुग्णांमुळे मृत्यू दर वाढतो असे मृत्यूदर विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.
लसीकरणाचा फायदा काय ?
नागरिकांना केलेल्या लसीकरणाचा सद्यस्थितीत थोडाच फायदा होईल. कारण, अनेकांचे लसीकरण होऊन 9 ते 6 महिने उलटून गेले आहेत. त्यामुळे, पुन्हा लसीकरण करण्याची गरज आहे. याचा अर्थ ज्यांच्या लसीकरणाला अनेक महिने झाले आहेत त्यांना बुस्टर डोस घेण्याची गरज आहे. आताच अनेकांचा डोस पूर्ण होत आहे. यासह लसीकरणाचा वेग देखील वाढण्याची गरज आहे. पण, त्यासह वयस्कर, बाधित शिवाय, कोमॉर्बिड स्थितीत असलेल्यांनी बुस्टर डोस घ्यायला हवा.
- डॉ. अविनाश सुपे, प्रमुख, मृत्यूदर विश्लेषण समिती
राज्यात 10 हजारांचा टप्पा पार
दरम्यान, राज्यातील सक्रिय रुग्णही झपाट्याने वाढले आहेत. तीन आठवड्यांपूर्वी 6 डिसेंबर रोजी राज्यात 6,200 सक्रिय रुग्ण होते. ज्यांनी आता 10 हजारांचा टप्पा पार केला आहे.
10 दिवसांतील सक्रिय रुग्णांचा आलेख
17 डिसेंबर - 1940
18 डिसेंबर - 1948
19 डिसेंबर - 2081
20 डिसेंबर - 2061
21 डिसेंबर - 2159
22 डिसेंबर - 2419
23 डिसेंबर - 2813
24 डिसेंबर - 3227
25 डिसेंबर - 3703
26 डिसेंबर - 4295
27 डिसेंबर - 4765
रुग्ण दुपटीचा कालावधी घटला
गेल्या आठवड्यापासून मुंबईसह राज्यभरातील कोविड रुग्णसंख्या वाढत आहे. आतापर्यंत नवीन कोविड रुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ झाली असून मुंबईत दररोज 700 ते 900 दरम्यान रुग्ण सापडत आहेत. नोव्हेंबर महिन्यात याच कालावधीत सरासरी 190 ते 215 च्या दरम्यान होती. डिसेंबर महिना आणि वर्षा अखेरीस मुंबईत पुन्हा एकदा रुग्णांचा आलेख वाढला असून दुपटीचा दर मात्र तीन पटीने कमी झाला आहे. सध्या मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी कमी झाला असून 967 दिवसांवर आहे. जो गेल्या आठवड्यात म्हणजेच 20 डिसेंबर या दिवशी 2095 दिवसांवर होता. दरम्यान, रुग्णसंख्या वाढत असल्याने रुग्ण दगावण्याचीही भीतीही व्यक्त केली जात आहे.
डिसेंबर महिन्यातील दुपटीचा कालावधी
27 डिसेंबर - 967
26 डिसेंबर- 1139
25 डिसेंबर- 1138
24 डिसेंबर - 1536
23 डिसेंबर - 1747
22 डिसेंबर - 1962
21 डिसेंबर - 2050
20 डिसेंबर - 2905
नोव्हेंबर महिन्यातील दुपटीचा कालावधी
27 नोव्हेंबर- 2711
26 नोव्हेंबर- 2682
25 नोव्हेंबर- 2616
24 नोव्हेंबर - 2585
23 नोव्हेंबर - 2526
22 नोव्हेंबर - 2484
21 नोव्हेंबर - 2403
20 नोव्हेंबर - 2408
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.