उल्हासनगर : शासकीय बालसुधारगृहातील १४ मुले कोरोना पॉझिटिव्ह

4 दिव्यांग मुलांचा समावेश,तहसील कोविड सेंटरमध्ये दाखल,उर्वरित 11 मुले 7 कर्मचारी निगेटिव्ह
corona
coronasakal
Updated on

उल्हासनगर : कॅम्प नंबर 5 मध्ये असलेल्या शासकीय बालसुधारगृहात राहणारी 14 मुले ही कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने उल्हासनगरात खळबळ उडाली आहे.त्यात 4 दिव्यांग मुलांचा समावेश असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.त्यांना तहसीलदार कार्यालया जवळील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

बालसुधारगृहात अनाथ आणि हरवलेल्या मुलांना आश्रय देण्यात येतो.याठिकाणी 13 ते 17 वयोगटातील 25 मुले आहेत.त्यापैकी 14 मुलांना गुरुवारी व शुक्रवारी असे दोन दिवस ताप,खोकला व उलट्यांचा त्रास होऊ लागला.त्यावेळी बालगृहात येणाऱ्या डॉक्टरांना या मुलांना कोरोना संसर्ग तर झाला नाही ना असा संशय येताच या मुलाची मध्यवर्ती सरकारी रुग्णालयात नेऊन त्यांची अँटीजन टेस्ट करण्यात आली.त्यात ही 14 मुलांना कोरोना पॉझिटिव्हचे सौम्य लक्षणे आढळून आले.

corona
विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शाळा मागतेय आर्थिक मदत

त्यांना तहसील कार्यालयाच्या नवीन इमारती मधील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.मोनिका जाधव यांच्या उपस्थितीत त्यांच्यावर उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप पगारे,डॉ.राजा रिजवानी यांनी दिली.

corona
२०५० पर्यंत दक्षिण मुंबईचा मोठा भाग पाण्याखाली जाण्याची भीती

25 पैकी 14 पॉझिटिव्ह निघाले असून उर्वरित 11 मुलांची आणि सुधारगृहातील 7 कर्मचारी यांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे.असे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांनी सांगितले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.