Deccan Queen : पंधरा दिवसांत चौथ्यांदा डेक्कन क्वीन एक्सप्रेसमध्य तांत्रिक बिघाड!

पुणे-मुंबई डेक्कन क्वीन एक्सप्रेसमध्ये पुन्हा एकदा तांत्रिक बिघाड झाल्याची घटना घडली.
Deccan Queen
Deccan Queensakal
Updated on

मुंबई - पुणे-मुंबई डेक्कन क्वीन एक्सप्रेसमध्ये पुन्हा एकदा तांत्रिक बिघाड झाल्याची घटना घडली. गेल्या पंधरा दिवस चौथ्यांदा पुणे- मुंबई डेक्कन क्वीन एक्सप्रेसमध्ये ब्रेक वायंडिंगचा प्रॉब्लेम आल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. या घटनेमुळे नोकरदरा वर्गासह प्रवाशांना मुंबईच्या कार्यालयात पोहचण्यासाठी लेटमार्क लागला आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,बुधवारी पुण्यावरून निघालेल्या डेक्कन क्वीन एक्सप्रेस पळसदरी स्थानक जवळ येत असताना सी-३ आणि डी- ४ डब्यात डब्यामधील ब्रेक वायंडिंगचा बिघाड झाला होता.त्यामुळे सकाळी ८.१२ वाजतापासून ते ९ वाजून २ मिनिटांपर्यत डेक्कन क्वीन एक्सप्रेस खोळंबली.

या घटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वेचे अभियांत्रिकी पथक घटना स्थळी दाखल होऊन ब्रेक रिलीज करण्यात आला आहे.तब्बल ५० मिनिटानंतर डेक्कन क्वीन एक्सप्रेसला मुंबईचा दिशेने रवाना करण्यात आली. त्यामुळे सीएसएमटी येथे सकाळी १०.२५ ला पोहोचणार्‍या डेक्कन क्वीनला सकाळी १०.४० वाजले. त्यामुळे प्रवाशांसह पासधारकांची मोठी गैरसोय झाली आहे.

चौथ्यांदा तांत्रिक बिघाड -

डेक्कन क्वीनला एक्सप्रेसला भारतीय रेल्वेची महाराणी म्हणून पूर्वी पासून ओळख आहे. डेक्कन क्वीनला पुणे स्थानकावरून दर दिवशी सकाळी सव्वासात वाजता सुटते, सव्वातीन तासांनी सकाळी साडेदहा वाजता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचते. मात्र, गेल्या पंधरा दिवसात दोनदा डेक्कन क्वीनमध्ये चौथ्यांदा तांत्रिक बिघाडाची घटना घडली आहे. त्यामुळे रेल्वेच्या या कारभावरामुळे डेक्कन क्वीनचे शान घालवणार असल्याचे परखड मत रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी सकाळशी बोलताना व्यक्त केले आहे.

पंधरा दिवसामध्ये चार वेळा बिघाड -

२७ डिसेंबर २०२३ - तळेगाव नजीक

१ जानेवारी २०२३ - पडसधारी

३ जानेवारी २०२३ - कुर्ला

१० जानेवारी २०२३ - पडसधारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.