Mumbai : संविधानाच्या स्वातंत्र्याचा वापर महापुरुषांना बदनाम करण्यासाठी करु नये - डॉ. श्रीपाल सबनीस

राजकीय संस्कृतीच्या माऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर यांना वापरणे त्यांचे भांडवल करणे योग्य नाही, ही संविधान संस्कृती नाही
Mumbai
Mumbai Sakal
Updated on

डोंबिवली : राजकीय संस्कृतीच्या माऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर यांना वापरणे, त्यांचे भांडवल करणे योग्य नाही, ही संविधान संस्कृती नाही. संविधानाच्या संस्कृतीला स्वातंत्र्य जरी असलं तरी स्वातंत्र्याचा वापर योग्य कारणासाठी करावा अशा प्रकारे एखाद्या महापुरुषाला बदनाम करण्यासाठी करु नये. भारतीय संस्कृतीच्या माऱ्यात, राजकारणात जनतेचा पक्ष हा विवेकाचा, सत्याचा लोकशाहीचा असावा तो कॉंग्रेस किंवा भाजपचा असा असू नये. निदान अभ्यासाच्या, मुल्यमापनाच्या संदर्भात तरी जनता ही निपक्षपाती असावी. राजकारणी हे पक्षपाती असतात जनता ही निपक्षपाती असावी असे मता वाटते असे मत ज्येष्ठ विचारवंत, अभ्यासक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी डोंबिवली येथे व्यक्त केले.

स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्यावतीने डोंबिवलीत द्वारका पॅलेस येथे भारतीय संविधान दिनानिमित्त संविधान प्रबोधन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत डॉ. सबनीस हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी संविधानाविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द वापरले आहेत. तर भारत जोडो यात्रेत राहूल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अपमान जनक वक्तव्य केले होते. याविषयी डॉ. सबनीस यांनी ही संविधानाची संस्कृती नाही असे सांगत वरील मत व्यक्त केले. पुढे ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे नव्हे तर भारताचे दैवत आहे. त्यांच्याविषयी अभ्यास न करता राज्यपाल कोश्यारी यांनी जी टिका केली आहे, अनादराने बोलले आहे. तो महाराष्ट्राचा, मराठी संस्कृतीचा अपमान आहे. राज्यपालांना न शोभणारे अशा प्रकारचे वक्तव्य आहे. पंतप्रधान मोदी यांनी अशी माणसे महाराष्ट्रात का पाठवावी असा प्रश्न पडावा अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि म्हणून राज्यपाल हे पद कितीही मोठे असले तरी त्या पदावर बसलेली माणसे जर खुजी असतील, अभ्यास करणारी नसतील, त्या प्रांताच्या संस्कृतीशी जुळणारी नसतील तर अशा लोकांना पंतप्रधान मोदी यांनी परत बोलवाणे आवश्यक आहे असे मला वाटत असल्याचे सांगितले.

सावरकरांविषयी डॉ. सबनीस म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संदर्भात त्यांनी माफी मागितली ही खरी गोष्ट आहे. देशभक्त असणारे सावरकर हे ब्राह्मण म्हणून त्यांची देशभक्ती नाकारण हे बरोबर होणार नाही. पण माफीच्या बाबतीत त्यांच्याकडे मर्यादा जाते. देशभक्ताने अशा प्रकारे माफी मागणे हे योग्य नाही हेही बरोबर पण देशभक्त कवी सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी 14 वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. त्यावेळच्या त्या वेदना, दुःख हे खरे आहे. त्या मरणप्राय यातना टाळण्यासाठी कोणी माफी मागितली तर ती मर्यादा आहे त्या माणसाची, स्वातंत्र्यवीराची. पण त्याच भांडवल करणे मला योग्य वाटत नाही.

राजकीय संस्कृतीच्या माऱ्यात शिवाजी महाराज किंवा सावरकर यांना वापरणे त्यांचे भांडवल करणे योग्य नाही. ही संविधान संस्कृती नाही. संविधानाच्या संस्कृतीला स्वातंत्र्य जरी असल तरी स्वातंत्र्याचा वापर योग्य कारणासाठी करावा अशा प्रकारे महापुरुष बदनाम करण्यासाठी करु नये. महापुरुष हा सामान्य माणूस देखील आहे. त्या सामान्य माणसाच्या मर्यादा बाजूला सारल्या पाहीजे आणि सामर्थ्याचे वंदन केले पाहीजे. प्रत्येक महापुरुषाची ताकद वेगवेगळी आहे, त्यांच्या मर्यादांना भांडवल करुन, त्यांना बदनाम करणे योग्य होणार नाही भारतीय संस्कृतीच्या माऱ्यात, राजकारणात जनतेचा पक्ष विवेकाचा, सत्याचा, लोकशाहीचा असावा तो कॉंग्रेस किंवा भाजपा अशा स्वरुपात असता कामा नये. निदान अभ्यासाच्या मुल्यमापनाच्या संदर्भात तरी जनता ही निपक्षपाती असावी पुढारी पक्षपाती असतात जनता ही निपक्षपाती असावी असे मला वाटते असे ते म्हणाले.

रामदेव बाबांच्या ब्रम्हचर्याला हा डाग आहे...

रामदेव बाबा यांनी महिलांच्या पेहरावाविषयी नुकतेच ठाणे येथे एक खळबळजनक विधान केले आहे. यावर डॉ. सबनीस म्हणाले. योगगुरु कितीही मोठे असले तरी महिलांच्या संदर्भात असे व्यक्त केलेले विधान निश्चित निषेधार्ह आहे. महिलांनी काय वापरावे किंवा कोणते कपडे परिधान करावे हे पूर्ण स्वातंत्र्य संविधानाने महिलांना दिलेले आहे. रामदेव बाबा सारख्या ब्रम्हचारी माणसाने हे बोलणे त्यांना शोभत नाही. त्यांच्या ब्रह्मचार्याला हा डाग आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.