मुंबई पूर्व उपनगरामध्ये नागरिक सहन करतायेत 'हा' नाहक त्रास...

मुंबई पूर्व उपनगरामध्ये नागरिक सहन करतायेत 'हा' नाहक त्रास...
Updated on

मुंबई कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर बरेच नागरिक हे वर्क फ्रॉम होम करतात. तसंच आता मुलांच्या शाळाही ऑनलाईन सुरु झाल्या आहेत. अशातच मुंबई पूर्व उपनगरातील नागरिकांना पॉवर कटचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन शिकवणी घेताना अडचणी निर्माण होताहेत.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडने कारण नसताना वीज कपात केल्यामुळे कांजूरमार्ग, भांडुप आणि मुलुंड या पूर्व उपनगरातील नागरिकांवर तीव्र परिणाम झाला आहे. यानंतर रहिवाशांनी तक्रार केली आहे की, लॉकडाऊनमुळे बहुतांश काम घरातून केलं जातं. त्यातही आता ऑनलाईन वर्ग सुरु झालेत अशात वीज नसल्यानं परिणाम झाला आहे.

होय, वीज कपात अधिकाधिक वारंवार होत आहेत आणि त्यांचा प्रत्येक गोष्टीवर परिणाम होत आहे. या दिवसांमध्ये अखंड वीजपुरवठा होणे अधिक महत्वाचे आहे कारण बरेच जण ऑनलाईन काम करताहेत. जेव्हा वीजपुरवठा बंद होतो, तेव्हा स्थानिक असलेलं इंटरनेट नेटवर्क देखील बंद होऊन जाते. यामुळे महत्त्वपूर्ण वेळ वाया जातो, स्थानिक रहिवासी नवनीत परदेशी यांनी सांगितले.

मुंबईसारख्या महानगरात अशा प्रकारची वीज कपात होणं हे गोष्ट पाहून मला आश्चर्य वाटले. आमच्या घरात वर्क फ्रॉम होम चालतं. तसंच लहान मुलांची ऑनलाईन शिकवणी असते. त्यात आता ही नवीन अडचण निर्माण झाली असल्याचं, आणखी एक रहिवासी नीरव ठक्कर म्हणालेत. 

त्यात महावितरणनं आता दरही वाढविले आहेत. मीटर रीडिंग घेतलं जात नाही. वाजवी समायोजनांच्या कोणत्याही आश्वासनाशिवाय सरासरी बिले दिलं जातं आणि त्या बिलात पैसे उकळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आणखी एक रहिवासी कौशिक डी. यांनी केला आहे. 

दुसरा रहिवासी अंकित गाला म्हणाले की, ज्या क्षणी जेव्हा वीज खंडित होते, त्यानंतर महावितरण कार्यालयातील सर्व तक्रार लँडलाइन नंबर व्यस्त होऊन जातात. आजकाल तर वीज कपातीची वेळ रात्रीच्या 3 वाजण्याच्या विचित्र सुमारास होते. हे सर्व अन्यायकारक आहे.

तर महावितरणच्या प्रवक्त्यानं यावर बोलणं टाळलं आहे. एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, वीजेचं विघटन कमी होतं आणि पावसाशी निगडित समस्या असल्यामुळे वीज कपात करण्यात आली होती. त्यामुळे लवकरच वीज पुरवठा पूर्ववत होईल. 

विधानसभेचे स्थानिक सदस्य मिहीर कोटेचा यांनी म्हटलं की, वीज कपातीमुळे होम आयसोलेशन असलेल्या रुग्णांच्या घरांमध्येही समस्या उद्भवली गेली. या समस्येबाबत अधिकाऱ्यांशी बोललो असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. मुलुंडमध्येही दररोज तासांनतास वीज व्यावहारिकदृष्ट्या विस्कळीत झाली आहे. घरात आयसोलेट केलेले रुग्ण, ऑनलाईन शाळा, वर्क फ्रॉम होम हे वीजेशिवाय अशक्य आहे. मी सरकारला विनंती करतो की त्यांनी निदान मुंबईसारख्या शहरात किमान वीज कपात होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.

frequent electricity cuts in eastern suburbs of mumbai citizens are angry

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.