लॉकडाऊन काळात चारोटी येथे दोन लहान भावंडांचा फळविक्रीचा व्यवसाय

fruit stall
fruit stall
Updated on

कासा : लॉकडाऊन काळात अनेक खासगी कार्यालये, कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या, मजुरींची कामे करणाऱ्यांवर देखील बेरोजगारीची वेळ आली, तर काहींच्या पगारात कपात झाली. अशा परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अनेकांनी किरकोळ फळे-भाजीपाला विकण्यास सुरुवात केली. 

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी येथे दोन लहान भावांनी फळविक्रीचा व्यवसास सुरू केला आहे. महेंद्र आणि कैलास अशी या भावंडांची नावे आहेत. हे दोघेही शालेय विद्यार्थी आहेत. महेंद्र पाचवीमध्ये आहे तर कैलास सहावीमध्ये आहे. घरातील मोठ्‌या मंडळींना कोरोना काळात काम मिळत नाही, शेती शिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही, ग्रामीण भागात हातावर पोट असलेल्या या कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहात हातभार लागावा म्हणून ही भावंडे फळविक्रीचा व्यवसाय करत आहेत. 

लॉकडाऊन काळात शाळा बंद असल्याने महेंद्र व कैलास या दोन भावांनी घराला हातभार लागावा म्हणून नेटच्या जाळीचे शेड करून छोटे फळ विक्रीचे दुकान सुरू केले आहे. दोघे ही शालेय विद्यार्थी असून आचार्य भिसे विद्यालयाचे विद्यार्थी आहेत. चिकू, पेरू, केळी, मोसंबी, सफरचंद या फळांची विक्री करून त्यातून मिळालेल्या पैसे ते घरखर्चासाठी देतात. लहान वयात त्यांना असलेल्या परिस्थितीची जाण पाहून परिसरातील लोक या भावंडांचे कौतूक करत आहेत. 

उपासमारीची वेळ 
या भागातील आदिवासी समाज शेती आणि मुजरी करून आपला उदरनिर्वाह भागवतो. परंतु, लॉकडाऊनपासून काम मिळत नसल्याने या आदिवासी कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. या सगळ्याची जाण असलेल्या या दोन लहान मुलांकडून आपल्या कुटुंबियांना मदतीचा हात दिला जात आहे. 

(संपादन : वैभव गाटे)

Fruit selling business of two younger siblings at Charoti in Lockdown

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.