मग मोठ्या लॉकडाउनची गरज नाही; मुंबईच्या पालकमंत्र्यांचे सूचक विधान

मग मोठ्या लॉकडाउनची गरज नाही; मुंबईच्या पालकमंत्र्यांचे सूचक विधान
Updated on

मुंबई: राज्यात सध्या कोरोनाची लाट आहे. दररोज मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित आढळत आहेत. कोरोनाची साखळ तोडण्यासाठी दिवसा जमावबंदी, रात्री संचारबंदी आणि वीकेंडला लॉकडाउन असा पॅटर्न महाराष्ट्रात सुरू आहे. मात्र नागरिकांकडून अद्यापही नियमांची पायमल्ली केली जात असल्याचे बोललं जातंय. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी संध्याकाळी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत राज्यात मोठा लॉकडाउन लावायचा की काही वेगळा निर्णय घ्यायचा याबद्दल चर्चा होणार आहे. हाचदरम्यान, राज्यात मोठ्या लॉकडाउनची गरज नसल्याचे मत मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी स्पष्ट केले.

"सध्या राज्यात वीकेंड लॉकडाउन सुरू आहे. मुंबईकरांना परिस्थितीची चांगली समज आहे. कोरोनाचा प्रभाव वाढताना दिसतोय. अशा वेळी शनिवार-रविवारच्या दिवशी अतिमहत्वाचे काम नसेल तर घराबाहेर पडू नका असं सांगण्यात आलं आहे. गेले काही दिवस नाइट कर्फ्यूमध्ये तरूण मंडळी आपल्या बाईकवरून विनाकारण फिरत असल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या होत्या. त्यामुळे आज मी स्वत:च मुंबईच्या रस्त्यांवर लॉकडाउनच्या अमलबजावणीची पाहणी करण्यासाठी उतरलो आहे. सध्याचे चित्र पाहून खूप बरं वाटतंय की मुंबईची जनता लॉकडाउनला चांगला प्रतिसाद देत आहे. जर अशाच प्रकारे लोकांनी योग्य ते सर्व नियम पाळले तर आपण कोरोनाची साखळी नक्कीच तोडू. मग अशा परिस्थितीत मोठा लॉकडाउन लावण्याची गरज उद्भवणार नाही", असं सूचक विधान पालकमंत्री शेख यांनी केलं.

कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी सरकारने सोमवारपासून निर्बंध लागू केले. जीवनावश्यक वस्तू सोडून अन्य दुकाने ३० तारखेपर्यंत बंद ठेवण्याच्या आदेश दिला. त्यानंतर व्यापारी वर्गातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. राज्यात ठिकठिकाणी व्यापारी रस्त्यावर उतरले. व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी अन्यथा सोमवारपासून सर्व दुकाने सुरू करण्याचा इशारा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स संघटनेने दिला. तशातच भाजपने व्यापारी वर्गाला पाठिंबा देऊन त्यांच्या भूमिकेचे समर्थनही केले. पण रूग्णसंख्या कमी होत नसल्याने कडक लॉकडाउन असणं महत्त्वाचं आहे या मतावर सरकारमधील काही मंडळी ठाम आहेत. याच मुद्द्यावरून आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील बैठकीत नक्की काय निर्णय होतो? याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.