मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक महिनाभरात झालेली नाही. त्यामुळे विकासकामांचे कोट्यवधी रुपयांचे 50 प्रस्ताव मंजुरीविना रखडले आहेत. महापालिका आयुक्तांनी आपल्या अधिकारात हे प्रस्ताव मंजूर न केल्यास विकासकामे रखडण्याची शक्यता असून, कोट्यवधींचा निधी वाया जाण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीची सभा दर आठवड्याला होते आणि विकासकामांचे कोट्यवधी रुपयांचे प्रस्ताव मंजूर केले जातात. परंतु, कोरोनाच्या सकटामुळे तीन ते चार बैठका झाल्याच नसल्याने विविध कामांचे ५० प्रस्ताव मंजुरीविना रखडले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने विकासकामांसाठीचा इतर निधीही लटकण्याची शक्यता आहे.
वैधानिक, विशेष आणि प्रभाग समित्यांमध्ये विविध कामांचे प्रस्ताव मंजुरीसाठी येतात. महापालिकेची तिजोरी समजली जाणाऱ्या स्थायी समितीची बैठक दर आठवड्याला होते. आरोग्य, शिक्षण, नालेसफाई, रस्ते, पूल, पाणीपुरवठा, मालमत्ता, उदंचन केंद्रे, उद्याने, मैदाने, आदी कामांचे प्रस्ताव मंजुरीसाठी येतात. कोरोनामुळे एप्रिलमध्ये एकही सभा झाली नाही. त्यामुळे आरोग्य, नालेसफाई, रस्ते आदी कामांचे कोट्यवधी रुपयांचे ५० प्रस्ताव रखडले आहेत.
आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मे महिन्यातील बैठकाही होण्याची शक्यता कमीच दिसते. त्यामुळे विकासनिधी लटकण्याची शक्यता आहे. आता महापालिका आयुक्तांच्या निर्णययाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आयुक्तांनी स्वत:च्या अधिकारात निर्णय घेतला नाही, तर विकासकामांचा कोट्यवधी रुपयांचा निधी वाया जाण्याची शक्यता आहे.
Fund of 50 proposals worth crores of rupees
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.