मोठी बातमी : २६ जुलैपासून सुरु होणार अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया, 'असे' आहेत प्रवेशासाठीचे तीन टप्पे

मोठी बातमी : २६ जुलैपासून सुरु होणार अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया, 'असे' आहेत प्रवेशासाठीचे तीन टप्पे
Updated on

मुंबई : दहावीतून अकरावीत कधी जातोय असं अनेक विद्यार्थ्यांना वाटतं. शाळा संपवून कॉलेजमध्ये जाण्याचा जोश, उत्साह आणि एक वेगळीच उमेद प्रत्येक विद्यार्थ्यात असते. यंदा कोरोनामुळे शाळा, कॉलेज, परीक्षा सगळंच ठप्प आहे. अशात अद्याप दहावीचे निकाल न लागल्याने अकरावी प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलली गेली. अशात आता अकरावीमध्ये प्रवेश घेण्याऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आली आहे. कारण आता अकरावीमध्ये प्रवेश घेण्यासाठीची ऑनलाईन प्रक्रिया सुरु होणारे. याबाबत सुधारित नियमावली जारी करण्यात आली आहे. २०२०- २०१२१ या शैक्षणिक वर्षातील अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना https://mumbai.11thadmission.org.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल. येत्या २६ तारखेपासून विद्यार्थी वरील संकेतस्थळावर नोंदणी करू शकतात. 

सदर प्रक्रिया ३ टप्प्यांमध्ये पार पडेल यातील पाहिले २ टप्पे २६ आणि २७ तारखेला सुरु होणार आहेत. काय आणि कसे आहेत हे टप्पे ? जाणून घेऊयात याबाबतची डिटेल माहिती 

  • पहिला टप्पा : 

यामध्ये विद्यार्थी, पालक यांनी स्वतः ही प्रक्रिया करायची आहे. यामध्ये विद्यार्थी किंवा पालक शाळांची मदत घेऊ शकतात. २६ जुलैला सुरु होणाऱ्या पहिल्या टप्प्यात ऑनलाईन नोंदणी, प्रवेश अर्ज (भाग १) भरायचा आहे. सोबतच अर्जातील माहिती प्रमाणित करण्यासाठी शाळा किंवा मार्गदर्शन केंद्र निवडणे आणि आपला फॉर्म व्हेरीफाईड करण्यासाठीचा हा टप्पा असणार आहे. 

  • दुसरा टप्पा :  

यामध्ये संबंधित शाळा आणि मार्गदर्शन केंद्रांनी विद्यार्थ्यांकडून आलेले फॉर्म्स व्हेरिफाय करणे, फॉर्ममध्ये काही त्रुटी किंवा आवशकता असल्यास विद्यार्थ्यांशी संपर्क साधणे असा दुसरा टप्पा असेल. दुसरा टप्पा हा २७ जुलै पासून सुरु होईल. 

  • तिसरा टप्पा : 

विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा (भाग २) भरायचा आहे. विद्यर्थी  किंवा पालक शाळा किंवा मार्गदर्शन केंद्राच्या मदतीने प्रवेश अर्जाचा (भाग २)  भरू शकतात. यामध्ये प्रवेशासाठीचा पसंतीक्रम विद्यार्थ्यांना नोंदवून सबमिट आणि लॉक करायचा आहे. मात्र महाराष्ट्र राज्य मंडळ इ. दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर याबाबतचा कालावधी जाहीर करण्यात येणार आहे. 

दरम्यान काढलेल्या जारी झालेल्या नव्यासुधारित परिपत्रकानुसार मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या भागात अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश विभागीय शिक्षण उपसंचालकांना दिले आहेत.

FYJC online admissions will start from 26th july check details about admission process

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.