मुंबई : कोरोनानं सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. कोरोनानं मुंबईत थैमानं घातलं आहे. ऑगस्ट महिन्यापासून दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसतोय. नियंत्रणात आलेल्या जी उत्तर विभागात कोरोना संसर्गानं पुन्हा डोके वर काढले आहे. जी उत्तरमध्ये शुक्रवारी तब्बल 105 नवीन रुग्णांची भर पडली.
धारावीमध्ये शुक्रवारी दिवसभरात 33 नवीन रूग्ण सापडले असून एकूण रूग्णसंख्या 2883 इतकी झाली आहे. तर 124 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दादरमध्ये शुक्रवारी 33 नवीन रुग्ण सापडले असून रुग्णांची एकूण संख्या ही 2916 इतकी झाली आहे. तर 454 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. माहीम मध्ये 39 नवीन रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची संख्या 2614 इतकी झाली. तर 432 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
तर धारावी,दादर,माहिम परिसराचा समावेश असणा-या जी उत्तर विभागात शुक्रवारी 105 नवीन रुग्णांची भर पडली असून रूग्णांचा एकूण आकडा 8413 वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत 514 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. धारावीमध्ये 2,489, दादरमध्ये 2,360 तर माहीममध्ये 2,095 असे एकूण 6,944 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 1010 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मुंबईत शुक्रवारी 2,172 रुग्ण सापडले. मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 1,65,287 झाली आहे. रूग्णवाढीच्या दरात ही वाढ झाली असून तो 1.03 वरून 1.20 टक्क्यावर पोहोचला आहे. मुंबईत शुक्रवारी 44 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 8,064 वर पोहोचला आहे. मुंबईत शुक्रवारी दिवसभरात 1,132 रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 78 टक्के इतका आहे.
मुंबईत शुक्रवारी नोंद झालेल्या 44 मृत्यूंपैकी 26 जणांना दीर्घकालीन आजार होते. एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 30 पुरुष तर 14 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या 31 रुग्णांपैकी तिघांचे वय 40 वर्षा खालील होते. 7 रुग्णांचे वय 60 वर्षावर होते तर 34 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते. कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढत आहे. शुक्रवारी 1,132 रुग्ण बरे झाले असून आजपर्यंत 1,29,244 रुग्णांना घरी सोडण्यात आले.मुंबईत रुग्ण दुपटीचा दर हा 58 दिवसांवर गेला आहे. तर 10 सप्टेंबर पर्यंत एकूण 8,87,274 कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर 4 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दरात वाढ होऊन तो 1.20 इतका झाला आहे.
----------------------
(संपादनः पूजा विचारे)
G in the north across the hundred corona disease
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.