धक्कादायक, धारावीसह या भागात वाढतोय कोरोनाचा प्रार्दुभाव

धक्कादायक, धारावीसह या भागात वाढतोय कोरोनाचा प्रार्दुभाव
Updated on

मुंबई:  जी उत्तरमध्ये शनिवारी तब्बल 103 नवीन रुग्णांची भर पडली असून धारावीसह दादर, माहिममध्ये देखील बाधित रूग्णांची संख्या वाढली आहे. धारावीमध्ये शनिवारी दिवसभरात 18 नवीन रूग्ण सापडले असून एकूण रूग्णसंख्या 2,001 इतकी झाली आहे.  131 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

दादरमध्ये शनिवारी 50 नवीन रुग्ण सापडले असून रुग्णांची एकूण संख्या ही 2,966 इतकी झाली आहे. 471 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. माहीममध्ये 35 नवीन रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची संख्या 2649 इतकी झाली.  442 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

धारावी, दादर, माहिम परिसराचा समावेश असणाऱ्या जी उत्तर विभागात शनिवारी 103 नवीन रुग्णांची भर पडली असून रूग्णांचा एकूण आकडा 8,516 वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत 517 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. धारावीमध्ये 2,500, दादरमध्ये 2,393 तर माहीममध्ये 2,120 असे एकूण 7,013 रुग्ण कोरोनामुक्त झालेत.  1,044 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मुंबईतील रूग्णदर वाढतोय

मुंबईत ही शनिवारी बाधित रुग्णांचा भडका उडाला असून काल दिवसभरात 2,321 रुग्ण सापडले. मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 1,67,608 झाली आहे. रूग्णवाढीच्या दरात ही वाढ झाली असून तो 1.20 वरून 1.21 टक्क्यावर  पोहोचला आहे. मुंबईत शनिवारी 42 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 8,106 वर पोहोचला आहे. मुंबईत शनिवारी 772 रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 78 टक्के इतका आहे.

मुंबईत शनिवारी नोंद झालेल्या 42 मृत्यूंपैकी 37 जणांना दीर्घकालीन आजार होते. काल दिवसभरात एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 26 पुरुष तर 16 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या 42 रुग्णांपैकी एकाचे वय 40 वर्षा खालील होते. 23 रुग्णांचे वय 60 वर्षा वर होते तर 18 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते.

 शनिवारी 772 रुग्ण बरे झाले असून आज पर्यंत 1,30,016 रुग्णांना घरी सोडण्यात आले. मुंबईत रुग्ण दुपटीचा दर हा 58 दिवसांवर गेला आहे. तर 11 सप्टेंबर पर्यंत एकूण 9,03,101  कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर 5 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दरात वाढ होऊन तो 1.21 इतका झाला आहे.

----------------------------

(संपादनः पूजा विचारे) 

G north Cororna patient count grew up in Dharavi Dadar Mahim

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.