मुंबई पालिकेनं दादर, धारावी भागात बंद केले तापाचे दवाखाने

मुंबई पालिकेनं दादर, धारावी भागात बंद केले तापाचे दवाखाने
Updated on

मुंबईः  दादर, माहीम आणि धारावी येथील रहिवासी कोविड-१९ची चाचणी आता चाचणी विनामूल्य करु शकणार आहेत. जी-उत्तर वार्डमध्ये कोरोना व्हायरसच्या घटनांमध्ये बर्‍याच प्रमाणात घट होत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेनं येथील तापाचे दवाखाने बंद केले असून एक विनामूल्य चाचणी केंद्र सुरू केलंय. अधिकची केंद्रे पाईपलाईनमध्ये असताना, सोमवारी दादर पश्चिममधील कोहिनूर इमारतीच्या सार्वजनिक पार्किंगमध्ये पहिलं केंद्र उघडण्यात आलं. यात ९० जणांची तपासणीही करण्यात आली आहे. पालिकेनं धारावीच्या यशाचं श्रेय तापाच्या क्लिनिकला दिलं, कारण त्यांनी कोरोना व्हायरसच्या विरुद्धच्या लढ्यात सर्वात मोठा हातभार लावला. एप्रिल ते जुलै दरम्यान या प्रभागात ७१ दवाखाने चालवण्यात आली. 

सहायक नगरपालिका आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितलं की, थोडीफार जरी शंका येत असल्यास प्रभागातील नागरिकांनी येऊन कोविड-१९ची चाचणी करुन घ्यावी. नागरिक एकतर स्वतःहून येऊ शकतात किंवा स्थानिक वॉर रूमला कॉल करू शकतात. तसंच डॉक्टरांशी लक्षणांविषयी चर्चा करू शकतात आणि चाचणीसाठी भेटीची वेळ ठरवू शकतात, असंही ते म्हणालेत.

शहराच्या 24 प्रशासकीय प्रभागांपैकी जी-उत्तर वार्ड सध्या तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक फटका बसला आहे. आतापर्यंत यात ६,५३२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी ४,६८७ रुग्ण बरे झालेत. तर सध्या प्रभागात १,४१७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत ४२८ रुग्णांचा मृत्यू झालाय. प्रभागातील दैनंदिन वाढीचा दर फक्त ०.९ टक्के आहे, जो शहरातील सर्वांत कमी आहे. शहराचा सरासरी दैनंदिन विकास दर १.०२ टक्के आहे.

बीएमसीच्या आकडेवारीनुसार, धारावी येथे मंगळवारी केवळ तीन नव्या रुग्णांची भर पडली. येथील रुग्णांची संख्या २,६४३ झाली. यात २,२०४ बरे झालेले आणि केवळ ८८ रुग्ण हे अॅक्टिव्ह आहेत. दादरमध्ये १७ नवीन प्रकरणे नोंदली गेली असून एकूण संख्या १,७६४ वर गेली आहे. एकूण १,१४२ रुग्णांना वैद्यकीय आणि क्वांरटाईन सेंटरमधून घरी सोडण्यात आलं. अजूनही या भागात ४४९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मंगळवारी जवळील माहीम भागात ११ नवीन प्रकरणं आढळून आली असून एकूण रुग्णांची संख्या १,६३२ वर गेली आहे. बरे झालेल्या रूग्णांची संख्या १,३६१ असून, २०० सध्या उपचार घेत आहेत.

G North Ward Dadar Dharavi can get tested Covid19 free

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.