आज ११ ऑगस्ट; १९० गाड्या कधी सोडणार?,चाकरमानी विशेष गाड्यांच्या प्रतिक्षेत

आज ११ ऑगस्ट; १९० गाड्या कधी सोडणार?,चाकरमानी विशेष गाड्यांच्या प्रतिक्षेत
Updated on

मुंबईः गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी ११ ऑगस्टपासून विशेष रेल्वे सोडण्यात येणार होत्या. मात्र राज्य सरकारकडून यावर अद्याप अंतिम निर्णय होणं बाकी आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये क्वॉरंटाईनची मर्यादा आल्यामुळे राज्य सरकारनं सोमवारी रेल्वेला गणपतीच्या विशेष गाड्या न सोडण्याची विनंती केली आहे. रेल्वेनं १९० पेक्षा जास्त गाड्यांची योजना आखली आहे आणि वेळापत्रक देखील तयार ठेवले आहे. मात्र अंतिम निर्णय न झाल्यामुळे योजनेला विराम मिळाला आहे. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. 

एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यानं सांगितले की, कोकणात क्वॉरंटाईन होण्याची वेगवेगळे नियम आखण्यात आलेत. राज्य सरकार यावर निर्णय घेत आहेत. एकदा सरकारनं रेल्वेला हिरवा कंदिल दिला की, या गाड्या चालवण्यात येतील.

दरम्यान,  रेल्वेकडून राज्य सरकारच्या नव्या सूचनेची दिवसभर प्रतीक्षा केली जात होती. यासंदर्भात परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. 

गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष रेल्वेगाड्या सोडण्यासाठी गेल्या आठवड्यात परवानगी देण्यात आली होती. यात राज्य सरकारने मध्य रेल्वेला दिलेल्या पत्रात विशेष रेल्वे गाडयांचं नियोजन करणे, आरक्षित तिकीट हा ई -पास म्हणून ग्राह्य धरणे, मार्गदर्शक तत्वानुसार रेल्वे प्रवासादरम्यान अंतर राखणे, निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक करण्यास सांगितले. त्यानंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेने विशेष गाडय़ा सोडण्याची मंजुरी रेल्वे बोर्डाकडून घेतली.

दम्यान, कोकणात जाणाऱ्या प्रवाशांनी गणपती सणाच्या प्रवासासाठी बस आणि गाड्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचा आरोप केला आहे. कोकणात जाण्यासाठी राज्य सरकारनं बसेसना परवानगी दिली आहे आणि राज्य परिवहनानं बसेस सुरू केल्यात. दोघांमध्ये समन्वय साधता दोन्हीही स्वतंत्रपणे चालत आहेत.

आम्ही याकडे लक्ष देण्यासाठी रविवारी सरकारला पत्र लिहिले आहे. कोकणात अनेक गावं रेल्वे स्टेशनपासून दूरवर आहेत. कोकण रेल्वे मोठ्या संख्येनं खेड्यांपासून दूर आहे. त्यामुळे घरापर्यंत पोहोचण्यासाठी कनेक्टिव्हीची समस्या उद्भवणार असल्याचं, कार्यकर्ते अक्षय महापदी यांनी म्हटलं आहे.

Ganesh Chaturthi 2020 Maharashtra government 190 Ganpati Special Trains hold

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.