मुंबईः कोरोनामुळे यंदाचा गणोशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येत आहे. चैतन्याच्या गणेशोत्सवात यंदा गणेशभक्तांनी उत्साहासोबत सामाजिक आणि सुरक्षिततेचे भान जपण्याचं आवाहन सातत्यानं राज्य शासनाकडून केले जात आहे. अनेक ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सवाची धूम कमी झाल्याचं प्रथमच पाहायला मिळत आहे. त्यात लालबाग म्हणजे गणेशोत्सव आणि गणेशोत्सव म्हणजे लालबाग, असंच ओळखलं जातं. दरवर्षी लालबागमधील प्रत्येक सार्वजनिक गणेश मंडळात भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. मात्र यंदाचं चित्र काहीसं वेगळं आहे.
दरवर्षी मुंबईतील गणपती पाहण्यााठी भक्तांची लालबाग-परळ या परिसरात मोठी गर्दी असते. गणेशोत्सवातील १० दिवस हा परिसर भक्तांच्या गर्दीनं फुललेले असतो. आकर्षक देखावे, प्रचंड गर्दीच्या मिरवणुका, रेल्वे स्थानकांवरील गर्दी, लालबाग-परळ परिसरात दरवर्षी हमखास दिसणारे हे दृश्य यंदा गायब झालं आहे.
मुंबईचा राजा म्हणून गणेशगल्लीचा गणपती फार प्रसिद्ध आहे. लालबागला येणारा प्रत्येक भक्त मुंबईच्या या राजाचं दर्शन घेतल्याशिवाय जात नाही. अशा या राजाचा दरबार यावर्षी ओस पडला आहे. लालबागमधली प्रत्येक गणेशोत्सव मंडळांनी यावर्षी कोरोना काळात सामाजिक भान जपत वेगवेगळे समाज हिताचे उपक्रम राबवले.
दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी केवळ विभागातील रहिवाशांना गणेशदर्शन देण्यात येत आहे. यंदा कोरोनाचे संकट आहे. चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या चिंतामणीच्या दर्शनाला भाविकांची अलोट गर्दी होत असते. चिंचपोकळीच्या चिंतामणीची देव्हाऱ्यातील चांदीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून हे वर्ष जनआरोग्य वर्ष साजरे करण्याचा मंडळाने निर्णय घेतला असल्याचं चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचे अध्यक्ष उमेश नाईक यांनी सांगितलं. तसंच चिंतामणीच्या भक्तांसाठी ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सर्व सूचनांचे पालन करूनच या वर्षीचा गणेशोत्सव साजरा करण्यात येणार असल्याचं नाईक यांनी म्हटलं आहे.
दरवर्षी मुंबईच्या कानाकोपऱ्यातून दररोज हजारो भाविक लालबाग-परळ इथं बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात. बाप्पाच्या दर्शनासाठी परळ, करी रोड, चिंचपोकळी रेल्वे स्थानकापासून भक्तांचे लोंढेच्या लोंढे लालबागच्या दिशेनं जात असतात. मात्र भक्तीमय आणि उत्साही वातावरणानं भारून टाकणारा हा परिसर यावर्षी शांत, सुना वाटतोय.
Ganesh festival 2020 Lalbagh Parel Area first time no crowded covid 19
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.