कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरबा किंवा दांडियाची शक्यता धूसर, गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रोत्सवासाठीही नियमावली

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरबा किंवा दांडियाची शक्यता धूसर, गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रोत्सवासाठीही नियमावली
Updated on

मुंबई : कोविडच्या पार्श्‍वभुमीवर यंदा मुंबईतील गरबा आणि दांडिया रद्द होण्याची शक्‍यता आहे. गणेशोत्सवाप्रमाणेच सार्वजिनक मंडळाची मुर्ती 4 फुट आणि घरगुती देवीची मुर्ती 2 फुटा पर्यंत ठेवण्याची सुचना महानगर पालिकेने केली आहे. त्याचबरोबर आगमन आणि विसर्जन सोोहळ्यांवर निर्बंध येऊ शकतील. 

मुर्ती बनवणाऱ्या मुर्तीकारांना मंडप उभारण्याची परवानगी मिळणार आहे. मात्र, फक्त मुर्तीची विक्री करण्यासाठी मंडप उभारण्याची परवानगी मिळणार नाही असे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

गणेशोत्सवाप्रमाणेच यंदा नवरात्रोत्सवासाठी राज्य सरकारच्या निर्देशानुसार महानगर पालिकेने नियमावली तयारी केली आहे. यात मुर्तीची उंचीची मर्यादा निश्‍चित करण्यात आली आहे. त्याचबरोबर मंडपात सोशल डिटन्सींग पाळणे तसेच देवीच्या दर्शनाची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन द्यावी.अशा सुचना पालिकेने केल्या आहेत. अशात दांडिया होण्याची शक्यता कमीच आहे.

मुर्तीकारांसाठी महत्त्वाचं

  • ज्या मुर्तीकारांना गेल्या वर्षी मंडप बांधण्याची परवानगी दिली आहे त्यांच्यासाठी वाहतुक पोलिसांची जुनीच परवानगी ग्राह्य धारावी आणि त्या आधारावर मुंबई महानगर पालिकेच्या स्थानिक कार्यालयामार्फत छाननी करुन निर्णय घेण्यात येणार आहे. 
  • नव्याने मंडप बांधण्यासाठी अर्ज करणाऱ्यांना पुर्वीप्रमाणे स्थानिक वाहतुक पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. 

गणेशोत्सावाप्रमाणेच नवरात्रोत्सव साजरा करण्याची सुचना महापालिकेने केली आहे. त्यामुळे विसर्जन आणि आगमन सोहळेही रद्द होण्याची शक्यता आहे. तसेच, मंडपातही 5 पेक्षा जास्त कार्यकार्यकत्यांना यावेळी हजर राहाताा येणार नाही. लवकरच त्याबाबत नियमावली जाहीर केली जाऊ शकते.

( संपादन - सुमित बागुल )

like ganesh utsav restrictions on navaratri amid corona pandemic

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.