Mumbai Mega Block Today: गणेशभक्तांचे होणार हाल; दर्शनासाठी बाहेर पडण्याआधी मेगा ब्लॉकची बातमी नक्की वाचा

Mumbai Mega Block News: ब्लॉकमुळे गणेशोत्सवाचा शेवटचा रविवार असल्याने गिरणगावातील सार्वजनिक गणपतीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांचे हाल होण्याची शक्यता आहे.
Mumbai Mega Block
Mumbai Mega Block
Updated on

मुंबई- उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी (ता. १५) मध्य रेल्वेने मेगाब्लॉक घेतला आहे. विद्याविहार ते ठाणे पाचव्या- सहाव्या मार्गिकेवर आणि हार्बर मार्गावरील सीएसएमटी-चुनाभट्टी/ वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या

ब्लॉकमुळे गणेशोत्सवाचा शेवटचा रविवार असल्याने गिरणगावातील सार्वजनिक गणपतीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांचे हाल होण्याची शक्यता आहे. शेवटचा रविवार असल्याने गणरायाचे दर्शन करण्याचे नियोजन केले होते; मात्र हार्बर मार्गावर ब्लॉक घेतल्याने आमची गैरसोय होणार आहे, असे प्रवासी स्वाती चरपे यांनी सांगितले. मध्य रेल्वेने उत्सव काळात मेगाब्लॉक घेऊ नये, असे प्रवासी प्रथमेश लोखंडे म्हणाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.